Sunday, August 31, 2025 09:23:24 PM

Diamond League 2025: डायमंड लीग 2025 अंतिम फेरीसाठी 7 खेळाडू निश्चित; नीरज चोप्राचाही समावेश

नीरजने यापूर्वी 2022 मध्ये डायमंड लीग ट्रॉफी जिंकली होती. 2023 आणि 2024 मध्येही त्याने फायनल गाठली, मात्र जेतेपदावर शिक्कामोर्तब करता आले नाही.

diamond league 2025 डायमंड लीग 2025 अंतिम फेरीसाठी 7 खेळाडू निश्चित नीरज चोप्राचाही समावेश

Diamond League 2025: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा जागतिक स्तरावरील स्पर्धेत चमकण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा हा भारतीय खेळाडू 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या डायमंड लीग 2025 च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत त्याच्यासोबत आणखी 6 दिग्गज खेळाडू मैदानात उतरतील. यामुळे विजेतेपदासाठी तगडी लढत पाहायला मिळेल.

नीरजची डायमंड लीगमधील कामगिरी

नीरजने यापूर्वी 2022 मध्ये डायमंड लीग ट्रॉफी जिंकली होती. 2023 आणि 2024 मध्येही त्याने फायनल गाठली, मात्र जेतेपदावर शिक्कामोर्तब करता आले नाही. या वेळी त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान गतविजेता अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर ठरणार आहे. पात्रता फेरीत नीरजने 4 पैकी 2 टप्प्यांमध्ये सहभाग घेतला आणि चौथ्या स्थानावर राहत फायनल गाठली. 

हेही वाचा - Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार 'या' मोठ्या कंपनीचे नाव; बीसीसीआय घेणार हा मोठा निर्णय

विश्वविजेता नीरजने मे महिन्यात दोहा टप्प्यात 90.23 मीटरचा फेक मारत 90 मीटरचा टप्पा ओलांडला. परंतु, तो ज्युलियन वेबरच्या मागे दुसऱ्या स्थानावर राहिला. नंतर, जून महिन्यात त्याने पॅरिस टप्प्यात 88.16 मीटर फेकून सुवर्णपदक जिंकत दमदार पुनरागमन केले.

फायनलमध्ये उतरणारे खेळाडू
नीरज चोप्रा (भारत)
एड्रियन मार्डारे
अँडरसन पीटर्स (गतविजेता)
केशॉर्न वॉलकॉट
ज्युलियन वेबर (जर्मनी)
ज्युलियस येगो
सायमन वेइलँड (स्वित्झर्लंड, यजमान देशाकडून)

हेही वाचा - Mirabai Chanu : मीराबाई चानूनं 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलं स्थान; या स्पर्धेत केली सुवर्णपदकाची कमाई

नीरजने या हंगामात आतापर्यंत 6 स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यापैकी त्याने 4 जिंकल्या आणि 2 मध्ये तो उपविजेता ठरला. त्याची शेवटची स्पर्धा 5 जुलै रोजी बेंगळुरूतील एनसी क्लासिक होती, जिथे त्याने 86.18 मीटरच्या फेकीसह विजेतेपद पटकावले. आता संपूर्ण देशाचे लक्ष 28 ऑगस्टच्या डायमंड लीग फायनलवर आणि त्यानंतर 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान टोकियोत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेकडे लागले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री