Thursday, August 21, 2025 03:37:30 AM

Champions Trophy 2025 Semi-Finals : भारत कोणाशी भिडणार? गट ‘अ’ व ‘ब’तील समीकरणं समजून घ्या

ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या सेमीफायलनमध्ये टीम इंडियाची गाठ कोणाशी पडणार याची चर्चा सुरू आहे. ब गटातील तसेच भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर सर्व समीकरण ठरतील.

champions trophy 2025 semi-finals  भारत कोणाशी भिडणार गट ‘अ’ व ‘ब’तील समीकरणं समजून घ्या
Champions Trophy 2025 Semi-Finals : भारत कोणाशी भिडणार? गट ‘अ’ व ‘ब’तील समीकरणं समजून घ्या

ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत टीम इंडियाने आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशवर आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर मात करून टीम इंडिया सध्या 'अ' गट मध्ये न्यूझीलंडच्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने देखील आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. यादरम्यान, सेमीफायनल सामन्यात भारताला कुणाशी दोन हात करावे लागणार? यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. ‘ब’ गट मधील गणितांवर सर्व काही अवलंबून असणार आहे.

'अ' गट मधील अंतिम सामना 2 मार्च रोजी दुबई येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्याचा निकाल गटातील अंतिम क्रमवारी निश्चित करेल. जर भारताने न्यूझीलंडला पराभूत केले. तर भारत 'अ' गट मध्ये पहिल्या स्थानावर येईल आणि न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर जाईल. या स्थितीत भारताचा सेमीफायनल सामना 'ब' गट मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी 4 मार्च रोजी दुबई येथे होईल.

'ब' गट मध्ये सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी तीन गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर अफगाणिस्तान दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 28 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना आणि 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामना 'ब' गट मधील अंतिम क्रमवारी ठरवतील. 

हेही वाचा - रोहित शर्माने मुंबईतील अपार्टमेंट भाड्याने दिले; दरमहा मिळणार 'इतके' भाडे

जर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत केले आणि दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवले. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहतील. या स्थितीत भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यास सेमीफायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होण्याची शक्यता आहे. जर भारत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. तर भारत 'अ' गट मध्ये दुसऱ्या स्थानावर राहील आणि सेमीफायनलमध्ये गट 'ब' मधील पहिल्या क्रमांकाच्या संघाशी, म्हणजेच दक्षिण आफ्रिकेशी 5 मार्च रोजी लाहोर येथे सामना होऊ शकतो.

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास आणि इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर 'ब' गट मधील क्रमवारीत बदल होऊ शकतो. ज्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचा सामना अफगाणिस्तानशी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.  

हेही वाचा - PAK vs BAN: पावसाने खेळ केला! पाकला एकही विजय न मिळवता स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला

 


सम्बन्धित सामग्री