AUS vs SA: ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामना रद्द झाल्यास Semi Final मध्ये कोण जाणार?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सातवा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार होता. हे दोन तुल्यबळ संघ रावपिंडीच्या मैदानावर आमने-सामने येणार होते. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. रावलपिंडीच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्याचे नाणेफेक देखील अद्याप होऊ शकलेले नाही. यामुळे दोन्ही संघांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे.
सामना ड्रॉ झाल्यास कोणता संघ सेमीफायनलमध्ये जाणार?
आजचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पावसामुळे रद्द झाला. तर नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांचे गुण तीन होतील. यामुळे दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी शेवटच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. जर या दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना जिंकला. तर त्यांच्यामध्ये चांगला नेट रनरेट असलेला संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल.
हेही वाचा - घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र देणार धनश्रीला 'इतकी' पोटगी. वाचून व्हाल थक्क
ग्रुप बी मध्ये इतर संघांची काय आहे स्थिती
इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे त्यांना सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. जर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना ड्रॉ झाला आणि इंग्लंड किंवा अफगाणिस्तानने पुढील दोन्ही सामने जिंकले. तर ते संघ ४ गुणांसह थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतील. त्यामुळे ग्रुप बीमधील परिस्थिती अधिक चुरशीची झाली आहे.
ग्रुप ए मध्ये भारत आणि न्यूझीलंडचे वर्चस्व
ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत अनुक्रमे दोन विजय मिळवले आहेत. आता हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये कोणत्या संघांशी भिडणार, हे आगामी सामन्यांवर अवलंबून राहील.
हेही वाचा - Ind vs Pak : पाकचे वस्त्रहरण करत टीम इंडियाने घेतला बदला, ‘किंग’ कोहलीची नाबाद शतक खेळी
पावसाचा सामना होणार की नाही यावर संपूर्ण ग्रुप बीमधील समीकरणे अवलंबून आहेत. जर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना पूर्ण झाला आणि कोणताही एक संघ विजयी झाला तर तो थेट सेमीफायनलमध्ये पोहोचेल. मात्र सामना रद्द झाल्यास इतर संघांसाठी संधी निर्माण होईल. त्यामुळे पुढील काही सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील उपांत्य फेरीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.