Sunday, August 31, 2025 05:13:45 PM

ICC चा मोठा निर्णय! भारताऐवजी 'या' देशात रंगणार कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना

ICC च्या सिंगापूर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत घोषित करण्यात आले की, पुढील तीन WTC फायनल्स (2027, 2029 आणि 2031) हे इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत.

icc चा मोठा निर्णय भारताऐवजी या देशात रंगणार कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना
WTC Final 2027
Edited Image

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2031 पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलचे यजमानपद इंग्लंडला सोपवले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना 2027 मध्ये होणार आहे. या सामन्याचे यजमानपद भारताला मिळू शकते, अशी चर्चा सुरू होती. मात्र ICC ने अलीकडे घेतलेल्या निर्णयामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ICC च्या सिंगापूर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत घोषित करण्यात आले की, पुढील तीन WTC फायनल्स (2027, 2029 आणि 2031) हे इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत.

भारताला नाही तर इंग्लंडला मिळाला यजमानपदाचा मान - 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट केले आहे की इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ला पुढील तीन फायनल्सचे यजमानपद देण्यात आले आहे. त्यामुळे भारताला किंवा अन्य देशांना यजमानपदाची संधी नाकारण्यात आली आहे.

WTC फायनल्सचा इतिहास - 

2021: साउथहॅम्प्टन (इंग्लंड) – न्यूझीलंडने भारताला 8 गडी राखून पराभूत केले.

2023: लॉर्ड्स (इंग्लंड) – ऑस्ट्रेलियाने भारतावर 5 गडी राखून विजय मिळवला.

2025: ओव्हल (इंग्लंड) – दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून मात केली.

हेही वाचा - युजवेंद्र चहल आणि आरजे महवश लंडनमध्ये एकत्र; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, आयसीसीने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'अलीकडील अंतिम सामन्यांचे आयोजन करण्याच्या यशस्वी ट्रॅक रेकॉर्डनंतर, बोर्डाने 2027, 2029 आणि 2031 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे यजमानपद इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला दिले आहे.' ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड म्हणाले, 'पुढील तीन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे यजमानपद इंग्लंड आणि वेल्सला देण्यात आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. या अंतिम सामन्यांचे आयोजन करणे हा सन्मान आहे आणि मागील टप्प्यातील यशाचा आधार घेण्यासाठी आम्ही आयसीसीसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहोत.'

हेही वाचा - भारतीय संघाची विक्रमी कामगिरी! 66 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये जिंकली 3 सुवर्ण पदके

ICC च्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय - 

सिंगापूरमधील ICC बैठकीत केवळ WTC फायनल्सच नाही तर अफगाण महिला क्रिकेटपटू, ICC महिला विश्वचषक 2025 (भारत) आणि ICC महिला T20 विश्वचषक 2026 (इंग्लंड) यावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. 
 


सम्बन्धित सामग्री