Thursday, August 21, 2025 03:38:11 AM

Champions Trophy 2025 : 8 संघ, 19 दिवस, 15 सामने, क्रिकेटच्या 'मिनी वर्ल्डकप'ला सुरुवात!

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत आहे.

champions trophy 2025  8 संघ 19 दिवस 15 सामने क्रिकेटच्या मिनी वर्ल्डकपला सुरुवात
Champions Trophy 2025 : 8 संघ, 19 दिवस, 15 सामने, क्रिकेटच्या 'मिनी वर्ल्डकप'ला सुरुवात!

‘मिनी वर्ल्डकप’ अशी ओळख असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडं आहे. मात्र, बीसीसीआयनं भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यामुळं भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.

 

8 संघ विजेतेपदासाठी झुंजणार 

ही स्पर्धा 8 संघांमध्ये खेळवली जात आहे. यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. भारतीय संघ ‘अ’ गटात असून भारतीय संघाची लढत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी होणार आहे. तर ’ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Champions Trophy 2025: हेच ४ संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये, दिग्गजांचा अंदाज

यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जात आहे. सर्व संघांचे सामने पाकिस्तानमधील कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे रंगणार आहेत. तर भारतीय संघाचे सर्व सामने दुबईतच पार पडणार आहेत. भारत सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहोचल्यास हे सामनेही देखील दुबईतच होणार आहेत.

 

हेही वाचा - Team India Record in Dubai: दुबईत टीम इंडियाला हरवणं कठीण! ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड बघाच

याआधी 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन ट्रॉफी झाली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानने पराभव करत विजेतेपद मिळवले होते. यंदा दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने येणार का?, याकडं सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे. भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईत रंगणार आहे.

 

चॅम्पियन ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ

  • रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव.

असे आहे चॅम्पियन ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक:

  • 19 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
  • 20 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
  • 21 फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
  • 22 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
  • 23 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
  • 24 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
  • 25 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
  • 26 फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
  • 27 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
  • 28 फेब्रुवारी - अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
  • 1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
  • 2 मार्च - न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
  • 4 मार्च - उपांत्य फेरी - 1, दुबई
  • 5 मार्च - उपांत्य फेरी - 2, लाहोर
  • 9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)
  • 10 मार्च - राखीव दिवस 

सम्बन्धित सामग्री