Monday, September 01, 2025 12:53:11 PM

IND vs AUS: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल?, 'या' खेळाडूची जागा धोक्यात!

उद्या मंगळवारी ICC Champions Trophy 2025 स्पर्धेचा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

ind vs aus सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल या खेळाडूची जागा धोक्यात
IND vs AUS: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल?, 'या' खेळाडूची जागा धोक्यात!

ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. उभय संघातील हा सामना उद्या 4 मार्च मंगळवार रोजी दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये अजिंक्य राहिला आहे. भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर ऑस्ट्रेलियाने फक्त एकच सामना जिंकला आहे. त्यांचे उर्वरित दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ अजूनही अजिंक्य आहेत, असं म्हणावं लागेल.

सेमीफायनल सामन्यात भारताला केवळ फायनल गाठण्याची संधी नाही, तर वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचीही सुवर्णसंधी आहे. अशा मोठ्या सामन्यात भारतीय संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही मोठे बदल करू शकतो. याचा आढावा आपण घेऊयात.

भारतीय संघ सलामी जोडीमध्ये कोणताही बदल करेल असे दिसत नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकदा डावाची सुरुवात करतील. रोहितचा या स्पर्धेतील फॉर्म विशेष चांगला राहिलेला नाही. त्याने बांगलादेशविरुद्ध 41, पाकिस्तानविरुद्ध 20 आणि न्यूझीलंडविरुद्ध फक्त 15 धावा केल्या आहेत. त्यामुळे या निर्णायक सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

दुसरीकडे, शुभमन गिलच्या बॅटमधून एक शानदार शतक पाहायला मिळाले आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध 46 आणि न्यूझीलंडविरुद्ध फक्त 2 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली मैदानात उतरणार आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध संयमी आणि झुंजार शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नॉकआऊट सामन्यातही त्याच्याकडून अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

मिडल ऑर्डरमध्ये मोठा बदल?

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजी करणार हे निश्चित मानले जात आहे. त्याने या स्पर्धेत 15, 56 आणि 79 धावा केल्या आहेत. तो धाकड फलंदाज आहे. त्यामुळे तो संघात असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, पाचव्या क्रमांकावर संघात मोठा बदल होऊ शकतो. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला वगळून ऋषभ पंतला संधी दिली जाऊ शकते. राहुलने बांगलादेशविरुद्ध नाबाद 41 आणि न्यूझीलंडविरुद्ध 23 धावा केल्या होत्या, पण त्याच्या संथ फलंदाजीमुळे संघ व्यवस्थापन हा निर्णय घेऊ शकतो.

हेही वाचा - रोहित शर्माने मुंबईतील अपार्टमेंट भाड्याने दिले; दरमहा मिळणार 'इतके' भाडे

टीम इंडिया 4 स्पिनर्ससह मैदानात उतरणार?

दुबईच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक मदत मिळते. त्यामुळे भारत चार स्पिनर्ससह खेळू शकतो. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्यासोबत वरुण चक्रवर्तीलाही संधी मिळू शकते. वरूणने न्यूझीलंडविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी घेतले होते. त्यामुळे त्याचा अंतिम 11 मध्ये समावेश नक्की मानला जात आहे. 

गोलंदाजीत मोहम्मद शमी मुख्य वेगवान गोलंदाज असणार आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याही त्यांच्या साथीला असेल. जडेजा, अक्षर आणि पंड्या यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे भारतीय संघाची फलंदाजीही अधिक मजबूत होईल.

हेही वाचा - Champion Trophy 2025: वसीम अक्रम पाकिस्तान क्रिकेट संघावर चिडला..

भारताची संभाव्य प्लेईंग 11 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी


सम्बन्धित सामग्री