Wednesday, August 20, 2025 12:00:25 PM

पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची निराशाजनक कामगिरी

भारतीय संघाने पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मात्र १८५ धावा केल्या.

पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची निराशाजनक कामगिरी

मुंबई : भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाचवा कसोटी सामना होत आहे. भारत सध्या 2-1 च्या फरकाने मालिकेत पिछाडीवर आहे. 

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला नाही. भारताने आपले दोन्ही सलामीवीर 10 ओव्हर्सच्या आत गमावले. केएल राहुल 4 तर यशस्वी जैस्वाल 10 धावा करून बाद झाला. कर्णधार रोहित शर्माच्या जागेवर आलेला शुभमन गिल आणि विराट कोहली हे भारतीय डाव सावरत होते. पण विराट कोहली स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

त्यानंतर रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये 48 धावांची भागेदारी झाली. रिषभ पंत 40 धावा करून बाद झाला. गेल्या सामन्यातील शतकवीर नितीश कुमार रेड्डी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याचा पाठोपाठ रवींद्र जडेजादेखील बाद झाला आणि भारताची धाव संख्या 119 वर 4 बाद वरून 134 वर 7 बाद झाली. कर्णधार जसप्रीत बुमराहने बहुमूल्य 22 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 3 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. भारताचा  डाव 185 धावा करून संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने 4, मिचेल स्टार्कने 3, पॅट कमिन्सने 2 तर नेथन लायनने 1 भारतीय फलंदाज बाद केला. 

ऑस्ट्रेलिया संघाला तीन ओव्हर्ससाठी फलंदाजीला यावं लागलं. चांगली फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला गमावलं. ऑस्ट्रेलियाची धाव संख्या 1 बाद 9 धावा अशी झाली. 


सम्बन्धित सामग्री