IPL 2025 Points Table: गुजरातकडून पराभव, RCBला मोठा फटका; अव्वल स्थान गमावलं
आयपीएल 2025 चा 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात RCB संघाला पहिला पराभव पत्करावा लागला. गुजरात टायटन्स (GT) संघाने शानदार कामगिरी करत हा सामना 8 गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.
RCB ला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. त्यांनी अव्वल स्थान गमावले आहे. याआधी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने सलग दोन सामने जिंकून पहिले स्थान मिळवले होते. पण गुजरातविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे ते थेट तिसऱ्या स्थानावर घसरले. त्यांचा नेट रन रेटही +2.266 वरून थेट +1.149 वर घसरला आहे.
हेही वाचा - Indian Cricketer Wife: 'या' आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी
दिल्ली आणि पंजाबचा फायदा
RCB च्या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांना मोठा फायदा झाला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यातील दोन्ही विजय मिळवले आहेत. पण उत्तम नेट रन रेटमुळे या दोन्ही संघांनी RCB ला मागे टाकले आहे. सध्या पंजाब किंग्ज (+1.485 नेट रन रेट) पहिल्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स (+1.320 नेट रन रेट) दुसऱ्या स्थानी आहे.
गुजरात टायटन्सची विजयी घोडदौड सुरू
गुजरात टायटन्स संघाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी मजल मारली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यांचा सध्याचा नेट रन रेट +0.807 आहे. RCB वर मोठा विजय मिळवून त्यांनी टॉप-4 मधील स्थान मजबूत केलं आहे.
हेही वाचा - DC Team Wishes KL Rahul: केएल राहुलच्या नवजात बाळासाठी डीसी संघाने केला अनोख्या पद्धतीने हार्दिक शुभेच्छा
मुंबई-चेन्नई संघर्ष, केकेआर तळात
पाच वेळा चॅम्पियन असलेला मुंबई इंडियन्स (MI) संघ पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी असून त्यांनी तीन पैकी एकच सामना जिंकला आहे. त्यांचा नेट रन रेट +0.309 आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सध्या सातव्या स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट -0.771 आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात तळात पोहोचला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने तीन पैकी फक्त एकच सामना जिंकला असून त्यांचा नेट रन रेट -1.428 आहे. केकेआरचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादसोबत आहे. हैदराबादचा (SRH) संघ सध्या आठव्या स्थानी आहे.