Monday, September 01, 2025 10:58:03 AM

‘हे’ आहेत IPL मध्ये सर्वाधिक मॅच जिंकणारे कर्णधार

कोण आहेत IPL इतिहासातील सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार. लवकर जाणून घ्या..

‘हे’ आहेत ipl मध्ये सर्वाधिक मॅच जिंकणारे कर्णधार
‘हे’ आहेत IPL मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL चा १८ वा हंगाम सद्या सुरू आहे. IPL च्या प्रत्येक हंगामात संघांचे कर्णधार आपापल्या संघाला विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असतात. काही कर्णधारांनी आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. IPL इतिहासातील सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार कोण आहेत? याचा आढावा आपण या लेखातून पाहुयात...


महेंद्र सिंग धोनी (१३३ विजय)

महेंद्र सिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचं काही काळ (RPSG) कर्णधारपद भूषवलं आहे. धोनीने IPL मध्ये १३३ सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. धोनी शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यानं आपले अचूक निर्णय आणि संघ व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. तो IPL मधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे.


रोहित शर्मा (८७ विजय)

मुंबई इंडियन्सचा (MI) माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा IPL विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने ८७ सामने जिंकले आहेत. तो धोनीनंतर IPL चा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो.

 

गौतम गंभीर (७१ विजय)

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा माजी कर्णधार गौतम गंभीरनं आपल्या नेतृत्वाखाली संघाला दोन वेळा IPL विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली KKR ने ७१ सामने जिंकले आहेत. गंभीरच्या आक्रमक नेतृत्वशैलीमुळं कोलकाता संघाने २०१२ आणि २०१४ साली IPL चे विजेतेपद पटकावले होते. 

हेही वाचा - Indian Cricketer Wife: 'या' आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी
 

विराट कोहली (६६ विजय)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचं अनेक वर्षे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीनं कर्णधार म्हणून ६६ सामने जिंकले आहेत. पण RCB संघाला त्याच्या नेतृत्वाखाली एकही IPL ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आत्तापर्यंत RCB संघाला एकदाही IPL ची ट्रॉफी उंचावता आलेली नाही.  

हेही वाचा -  DC Team Wishes KL Rahul: केएल राहुलच्या नवजात बाळासाठी डीसी संघाने केला अनोख्या पद्धतीने हार्दिक शुभेच्छा

 

श्रेयस अय्यर (४० विजय)

श्रेयस अय्यरनं दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. आता तो पंजाब किंग्ज (PBKS) संघाचं कर्णधारपद सांभाळत असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघांने ४० सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्यांदाच IPL फायनलमध्ये पोहोचवण्याचा मान त्याला जातो. तर केकेआरला त्याने IPL विजेतेपद मिळवून दिलं आहे. गतवर्षी अय्यरकडे केकेआरची कमान होती. त्यावेळी त्यानं संघाला विजेतेपद मिळवून दिलं आहे. 


सम्बन्धित सामग्री