Thursday, August 21, 2025 12:04:00 AM

तुटलेल्या माहीची साक्षी बनली आधार; जाणून घ्या धोनी आणि साक्षीची लव्हस्टोरी

भारतासाठी सर्वाधिक आयसीसी विजेतेपद जिंकणारा महेंद्रसिंह धोनी बऱ्याचदा लाईमलाईटपासून दूर राहतो. धोनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याची लव्हस्टोरी खूपच सुंदर आहे.

तुटलेल्या माहीची साक्षी बनली आधार जाणून घ्या धोनी आणि साक्षीची लव्हस्टोरी

मुंबई: टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार आहे. भारतासाठी सर्वाधिक आयसीसी विजेतेपद जिंकणारा महेंद्रसिंह धोनी बऱ्याचदा लाईमलाईटपासून दूर राहतो. धोनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याची लव्हस्टोरी खूपच सुंदर आहे.

धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी एकाच शाळेत शिकत होते. साक्षी त्या शाळेत ज्युनियर होती. तरीही दोघांचं एकमेकांशी बोलणं होत नव्हतं. दोघांचेही वडील रांचीतील एका कंपनीत काम करत होते. साक्षी आणि एमएस धोनी यांची पहिली भेट 2008 मध्ये त्यांचे मॅनेजर युधजीत दत्ता यांच्यामार्फत झाली. ज्या हॉटेलमध्ये साक्षी इंटर्नशिप करत होती, एके दिवशी धोनीही त्याच हॉटेलमध्ये आला आणि त्याने हॉटेल मॅनेजरकडून साक्षीचा नंबर मागितला. नंबर मिळाल्यानंतर धोनीने साक्षीला मेसेज केला. त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. त्यानंतर दोघांनीही जवळजवळ अडीच वर्षे एकमेकांना डेट केले. या काळात त्यांनी कधीही त्यांचे नाते सार्वजनिक केले नाही. पण नंतर दोघांच्या कुटुंबांनी लग्नासाठी सहमती दर्शवली.

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीचा जन्म 19 नोव्हेंबर 1988 रोजी आसाममध्ये झाला होता. साक्षीने तिचे पूर्व-प्राथमिक शिक्षण आसाममधील लेखापानी येथील शाळेतून घेतले होते. याच शाळेतून बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही शिक्षण घेतले होते. माहितीनुसार, दोघेही वर्गमित्र होते. साक्षीने नंतर डेहराडूनमधील वेलहॅम गर्ल्स स्कूल आणि रांचीमधील जवाहर विद्या मंदिरमध्ये शिक्षण घेतले होते. यादरम्यान, एमएस धोनी जेव्हीएम स्कूलमध्ये साक्षीचा सीनियर होता.

साक्षीचे वडील राजेंद्र सिंह रावत हे कोलकात्याच्या आरके सिंह बिनागुरी चहा कंपनीत 30 वर्षांहून अधिक काळ काम करत होते. साक्षीची आई शीला सिंह गृहिणी आहेत. साक्षीने छत्रपती संभाजीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून पदवी प्राप्त केली आहे. तिने कोलकात्यातील ताज बंगाल हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली आहे. हेच ते ठिकाण होते जिथे पहिल्यांदा साक्षी आणि धोनीची भेट झाली. ती 'साक्षी रावत फाउंडेशन'ची संस्थापक आहे. ही संस्था अनाथांना मदत करण्यासाठी काम करते. धोनी आणि साक्षी यांचे लग्न 4 जुलै 2010 रोजी देहरादून येथे झाले होते. साक्षी आणि धोनीच्या लग्नाला 14 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. दोघेही एका गोंडस मुलीचे पालक आहेत, जिचे नाव आहे जिवा धोनी.


सम्बन्धित सामग्री