Thursday, August 21, 2025 02:52:48 AM

मध्य प्रदेशला पिछाडत मुंबईने पटकावले सय्यद मुश्ताक अली करंडकाचे जेतेपद

श्रेयस अय्यर ने एकाच वर्षी कर्णधार म्हणून आयपीएल आणि सैय्यद मुश्ताक अली करंडक जिंकून इतिहास रचला.

मध्य प्रदेशला पिछाडत मुंबईने पटकावले सय्यद मुश्ताक अली करंडकाचे जेतेपद

बेंगळुरू - मुंबई संघाचं देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेंमधील वर्चस्व चालूच आहे. रणजी, इराणी, देवधर, विजय हजारे, दुलीप आणि सय्यद मुश्ताक अली या सर्व करंडकांना मिळून मुंबईने 63 वेळा विजेतापदावर आपले नाव कोरले आहे.

प्रथम फलंदाजी करत असलेल्या मध्य प्रदेशला सुरवातीपासून मुंबई संघाने 'बॅकफूट' वर ढकललं. शार्दूल ठाकूरने मध्य प्रदेशच्या दोन्ही सलामीवीरांना त्याच्या पहिल्या आणि सामन्याच्या दुसऱ्या शतकात बाद केलं. त्यांनतर मात्र मध्य प्रदेशच्या हरप्रीत सिंह आणि शुभ्रांशू सेनापती यांनी 42 धावांची साजेदारी केली. मध्य प्रदेशचा डाव सावरत होता असं वाटत असताना अथर्व अंकोलेकरने हरप्रीत सिंहला बाद केलं. त्याच्या पाठोपाठ शुभ्रांशू सेनापतीदेखील बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेला मध्य प्रदेशच्या कर्णधार रजत पाटीदार ने सर्वप्रथम मध्य प्रदेशचा डाव सावरला. मात्र त्यांनतर त्याने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. त्याने 40 चेंडूत 6 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 81 धावा केल्या. त्यांचा शिवाय कोणताच मध्य प्रदेशचा फलंदाज जास्त काही प्रभाव टाकू शकला नाही. मध्य प्रदेशकडून शुभ्रांशू सेनापती 23, हरप्रीत सिंह 15, वेंकटेश अय्यर 17 आणि राहुल बाथम याने 19 धावा केल्या. मुंबईकडून शार्दूल ठाकूर आणि रॉयस्टेन डायसने प्रत्येकी 2 तर अंकोलेकर, कोटियान, शिवम दुबे आणि सुर्यांश शेगडी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

मुंबईने फलंदाजीच्या वेळी पृथ्वी शॉ ला 15 धावत गमावलं. मात्र अजिंक्य राहणेने आणि श्रेयस अय्यर ने 32 धावांची जलद भागेदारी केली. अय्यर 9 चेंडूत 16 धावकरून बाद झाला. नंतर सूर्यकुमार यादव आणि राहणे यांनी चांगली फलंदाजी करत मुंबईला विजयाकडे पोहचवले. सुर्यांश शेगडेने 15 चेंडूत 36 धावा करून सामना मुंबई संघाला जिंकावला. श्रेयस अय्यर ने एकाच वर्षी कर्णधार म्हणून आयपीएल आणि सैय्यद मुश्ताक अली करंडक जिंकून इतिहास रचला.


सम्बन्धित सामग्री