Monday, September 01, 2025 12:54:37 AM

ICC ODI Ranking: गिल नंबर १, बाबर आझमला धक्का, ४ भारतीय खेळाडू टॉप-१० मध्ये

शुभमन गिलने आयसीसी वन डे फलंदाजी क्रमवारी यादीत अव्वल स्थान मिळवत मोठी कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

icc odi ranking गिल नंबर १ बाबर आझमला धक्का ४ भारतीय खेळाडू टॉप-१० मध्ये
ICC ODI Ranking: गिल नंबर १, बाबर आझमला धक्का, ४ भारतीय खेळाडू टॉप-१० मध्ये

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना लाहोरच्या मैदानात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. या सामन्याच्या आधी आयसीसीने वनडे फलंदाजांच्या क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने पाकिस्तानच्या फलंदाज बाबर आझमला दणका दिला आहे.  

शुभमन गिलने आयसीसी वन डे फलंदाजी क्रमवारी यादीत अव्वल स्थान मिळवत मोठी कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. मागील काही वर्षांपासून वनडे क्रमवारीत बाबर आझम पहिल्या स्थानावर होता. आता गिलने त्याला मागे ढकलत अव्वलस्थान काबिज केले आहे. गिलने ७९६ रेटिंग पॉइंट्स मिळवत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर बाबर ७७३ गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील टॉप-३ मध्ये पोहोचला आहे. तो ७६१ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

 

हेही वाचा - भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहची उणीव भासेल का ?

 

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेन (७५६) चौथ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल (७४०) पाचव्या स्थानावर आहे. भारताच्या विराट कोहलीने सहावा क्रमांक मिळवला आहे. तर श्रेयस अय्यर नवव्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, फलंदाजी क्रमवारी यादीत टॉप-१०फलंदाजांमध्ये  भारताचे ४ खेळाडूंचा समावेश आहे.

 

हेही वाचा - Team India Record in Dubai: दुबईत टीम इंडियाला हरवणं कठीण! ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड बघाच

 

इंग्लंडविरुद्ध गिलची शानदार कामगिरी

शुभमन गिलच्या शानदार फॉर्मचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी त्याला भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने या मालिकेत दमदार कामगिरी करत आपली छाप सोडली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक ठोकले. तर तिसऱ्या सामन्यात शानदार शतक झळकावले. या मालिकेतील तीन सामन्यांत त्याने ८६.३३ च्या सरासरीने २५९ धावा केल्या. या कामगिरीचा फायदा गिलला क्रमवारीत झाला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरनेही चांगली फलंदाजी करत ६०.३३ च्या सरासरीने १८१ धावा केल्या. या मालिकेत रोहित शर्मा आणि गिल दोघांनीही शतक झळकावत भारताला महत्त्वाच्या विजयात मोठे योगदान दिले.  


सम्बन्धित सामग्री