Wednesday, August 20, 2025 09:36:19 AM

नागपूरच्या आदित्य सरवटेच्या गोलंदाजीमुळे केरळ रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत

अंतिम सामन्यात जाण्यासाठी होती 4 विकेट्सची आवश्यकता, चारही गडी केले आदित्यने बाद

नागपूरच्या आदित्य सरवटेच्या गोलंदाजीमुळे केरळ रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत

मुंबई: रणजी करंडक 2025 चा उपांत्य फेरीचा केरळ विरुद्ध गुजरात असा झाला. हा सामना क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी ठरला. सामन्याच्या पाचव्या दिवसांपर्यंत निकाल कोणत्या संघाच्या बाजूने येईल हे समजत नव्हते.  

केरळ संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केरळ संघासाठी योग्यदेखील ठरला. केरळने 457 धावांचा डोंगर उभारला. केरळ संघाकडून मोहम्मद अझरुद्दीनने 177 धावा केल्या. गोलंदाजी करताना दुर्बल वाटणाऱ्या गुजरात संघाने मात्र फलंदाजीच्या वेळी चांगलीच कंबर कसली. केरळ संघाच्या गोलंदाजांना सुरवातीपासून बॅकफूटवर टाकले. गुजरातची सलामी जोडी सर्वात महत्वाची मानली जाते. माझी कर्णधार प्रियंक पांचाळ आणि आर्य देसाईने 131 धावांची भागेदारी केली. 131 च्या धावसंख्येवर आर्य देसाई बाद झाला. मात्र, प्रियंक पांचाळ एका बाजूने डाव धरून ठेवला. त्यानंतर प्रत्येक फलंदाजाने प्रियंकला साथ दिली. प्रियंक 148 धावांची खेळी करून बाद झाला.  

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जयमित पटेलने हळू - हळू सामना गुजरातचा दिशेनं वळवायला सुरवात केली होती. तेवढ्यातच जलज सक्सेनाने गुजरातचा कर्णधार चिंतन गजाला बाद केले. धावसंख्या 6 बाद 325 अशी झाली होती. पण, विशाल जयस्वाल आणि जयमित पटेलने गुजरातचा डाव सांभाळला.  

'पाकिस्तान भारताला हरवणार' IITian बाबाचं भाकीत

सामना गुजरातच्या दिशेने जाणार आहे असं वाटत होतं. केरळचे गोलंदाज थकलेले दिसत होते. क्षेत्ररक्षकांचे खांदे पडले होते. अंतिम फेरीत पोहचण्याच्या अपेक्षा मंदावत होत्या त्याक्षणी केरळचा कर्णधार सचिन बेबी चेंडू देतो नागपूरच्या आदित्य सरवटेला. तोच आदित्य जो 2018 रणजी करंडकाच्या अंतिम फेरीतील सामनावीर, 2 वेळा रणजी जिंकणारा आणि गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये भरोश्याचा मानला जाणारा खेळाडू. अंतिम फेरीत जाण्यासाठी केरळला होती, 4 विकेट्स घेण्याची. पहिली आदित्यने बाद केले विशाल जैस्वालला, त्यानंतर सिद्धार्थ देसाई आणि जयमित पटेलमध्ये भागेदारी झाली. भागेदारी झाली 79 धावांची सामना दोन्ही दिशेने वळण्याची शक्यता होती. मात्र, केरळकडे होते 2 सेट फलंदाज, त्याक्षणी आदित्यने जयमित पटेलला बाद केले. गुजरातला गरज होती 21 धावांची आणि 2 फलंदाज बाकी होते. दोन खेळाडूंमध्ये एक छोटी भागेदारी झाली. सामना जिंकायला गरज होती 11 धावांची आणि आदित्य सरवटेने बाद केलं सेट सिद्धार्थ देसाईला.  

शेवटचा 1 गडी होता. आणि उरल्या होत्या फक्त 2 धावा. आदित्य सरवटेच्या गोलंदाजीवर अरझान नागावासवालाने लेग साईडला एक फटका खेळला, तो सिली मिडऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटवर बसून गेला स्लिपच्या फिल्डरच्या हाती आणि एक सोपी झेल कर्णधार सचिन बेबीने घेतली.  

सामना जिंकून केरळने रचला इतिहास आणि पहिल्यांदाच रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहचले. अंतिम फेरीचा सामना आदित्य सरवटेचा माझी संघ विदर्भ विरुद्ध सध्याचा संघ केरळ असा रंगेल. विदर्भकडून आदित्य सरवटे आणि जलज सक्सेना यांनी प्रत्येकी 4-4 गडी बाद केले तर निधीश आणि बसील यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला. 177 धावा करणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीनला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.


सम्बन्धित सामग्री