Wednesday, August 20, 2025 04:35:03 AM

Salman Khan: सलमान खानला आयपीएल टीमची ऑफर, म्हणाला 'मला एक टीम खरेदी करण्याची...

बॉलिवूड स्टार सलमान खानने आयपीएल टीम खरेदीबाबत खुलासा केला. तो म्हणाला, टीम घेण्याची ऑफर मिळाली होती पण नाकारली. गली क्रिकेट व ISPLसोबतच तो आनंदी असून आयपीएलपासून दूर राहणार आहे.

salman khan सलमान खानला आयपीएल टीमची ऑफर म्हणाला मला एक टीम खरेदी करण्याची

Salman Khan: क्रिकेट आणि बॉलिवूडचा नातंच वेगळं आहे . मैदानावर चेंडू फिरत असताना, पडद्यावरच्या मोठ्या स्टार्सच्या उपस्थितीने लीगचा ग्लॅमर आणखी वाढतो. इंडियन प्रीमियर लीग (IPL) आज जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय फ्रँचायझी आधारित क्रिकेट लीग मानली जाते. 2008 मध्ये केवळ आठ संघांसह सुरुवात झालेली ही लीग आज 10 संघांपर्यंत पोहोचली आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्ससारख्या नव्या संघांनी गेल्या काही वर्षांत आपली छाप सोडली आहे.

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आयपीएलमध्ये टीम मालकी हक्क घेतले आहेत. शाहरुख खान आणि जुही चावला हे कोलकाता नाईट रायडर्सचे सह-मालक असून, प्रीती झिंटा पंजाब किंग्जशी जोडलेली आहे. या यादीत सलमान खानचे नाव येईल का, असा प्रश्न चाहत्यांना सतावत होता.

यावर सलमान खानने नुकतंच उत्तर दिलं आणि चाहत्यांना थोडा धक्का दिला. एका कार्यक्रमात आयपीएल टीम खरेदीबाबत विचारलं असता सलमान म्हणाला, 'आता मी म्हातारा झालोय टीम खरेदी करण्यासाठी. खूप वर्षांपूर्वी मला टीम घेण्याची ऑफर मिळाली होती, पण मी ती स्वीकारली नाही. आणि त्याचा मला आजही कुठलाही पश्चाताप नाही. आयपीएलसारखी मोठी लीग आमच्यासाठी नाही. आमची मजा म्हणजे टेनिस बॉल आणि गली क्रिकेट. आम्ही ISPLसोबत खुश आहोत.'

हेही वाचा: Coolie Movie: थलायवा फीव्हर! Coolie साठी एका तिकिटावर चाहत्यांनी केली हजारोंची उधळण, किंमत ऐकून थक्क व्हाल

त्याच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींना वाटलं होतं की सलमान लवकरच आयपीएलशी जोडला जाईल, मात्र त्याने स्पष्ट सांगितलं की त्याची आवड वेगळी आहे आणि तो स्वतःच्या स्टाईलमध्येच खेळाचा आनंद घेतो.

दरम्यान, सलमान खान सध्या आपल्या आगामी ‘बॅटल ऑफ गॅलवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 2020 मधील भारत-चीन गॅलवान व्हॅली संघर्षावर आधारित आहे. यापूर्वी तो रश्मिका मंदानासोबत ‘सिकंदर’  मध्ये झळकला होता, मात्र या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

आयपीएलचा हंगाम जसजसा जवळ येतोय, तसतसं चाहत्यांच्या चर्चेत हा मुद्दा अजून रंग घेईल यात शंका नाही. सलमान खान आयपीएलपासून दूर राहिला, तरी क्रिकेटबाबतचा त्याचा उत्साह आणि गली क्रिकेटची आवड चाहत्यांना नक्कीच भावेल.


सम्बन्धित सामग्री