Thursday, August 21, 2025 12:02:26 AM

Virat Kohli : विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार? भविष्याचा प्लॅन उघड करत दिले निवृत्तीचे संकेत

आगामी काळात विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, याचे संकेत त्याने खुद्द दिले आहेत. तसंच त्यानं निवृत्तीनंतरचा प्लॅन देखील सांगितला आहे.

virat kohli  विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार भविष्याचा प्लॅन उघड करत दिले निवृत्तीचे संकेत
Virat Kohli : विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार? भविष्याचा प्लॅन उघड करत दिले निवृत्तीचे संकेत
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या क्रिकेट भविष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. आगामी काळात तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत खुद्द विराटने दिले आहेत. तसेच निवृत्तीनंतर काय करणार याबद्दलही त्याने आपले विचार मांडले आहेत.

विराट कोहली सध्या IPL 2025 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंगळुरूमध्ये पोहोचला आहे. तेथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) इनोव्हेशन लॅबमध्ये बोलताना त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.

विराट बोलताना म्हणाला की, ‘शक्यतो माझ्यात आणखी एक ऑस्ट्रेलिया दौरा खेळण्याची क्षमता नसेल. त्यामुळे मी आतापर्यंत जे काही मिळवले आहे. त्यावर मी समाधानी आहे.’

विराटच्या या वक्तव्यामुळं विराट कोहली लवकरच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा हा महान खेळाडू टेस्ट क्रिकेटमध्ये 9000 हून धावा करणारा खेळाडू आहे. त्याने कसोटीत 29 शतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याची निवृत्ती भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का असू शकतो.

निवृत्तीनंतरच्या योजनांबद्दल विचारले असता कोहली म्हणाला की, ‘मला देखील ठाऊक नाही की निवृत्तीनंतर मी काय करणार. मी नुकताच एका संघ सहकाऱ्याला हा प्रश्न विचारला आणि त्यानेही हाच उत्तर दिलं. पण कदाचित निवृत्तीनंतर मी खूप प्रवास करेन.

टीम इंडियाने दुबईमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर कोहली म्हणाला, संघ म्हणून आम्ही परिस्थितीला उत्तम प्रकारे सामोरे गेलो. त्यामुळेच आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

 

हेही वाचा - IPL 2025: राजस्थान रॉयल्सचे हेड कोच राहुल द्रविड कुबड्यांच्या आधाराने पोहोचले संघाच्या कॅम्पमध्ये, पाहा VIDEO

 

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची संधी

विराटने 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट समाविष्ट होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग होणे ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. जर आम्ही पदक जिंकून परतलो, तर ही संघासाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे.

 

हेही वाचा -  दिल्ली कॅपिटल्सचा नवा सेनापती! IPL 2025 मध्ये अक्षर पटेलची निवड

 

दरम्यान, विराटच्या या विधानांमुळं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटाबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. टेस्ट क्रिकेटमधून त्याची संभाव्य निवृत्ती भारतीय संघासाठी मोठी बाब असणार आहे.  


सम्बन्धित सामग्री