Wednesday, August 20, 2025 12:00:41 PM

विराट कोहली खेळणार रणजी करंडक

विराट कोहली सोबत रोहित शर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलदेखील आपापल्या संघासाठी रणजी करंडक खेळताना दिसणार

विराट कोहली खेळणार रणजी करंडक

मुंबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दिल्ली संघासाठी रणजी सामना खेळणार आहे. विराट कोहली ३० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या रणजी सामन्यांच्या फेरीत खेळण्यासाठी उपलब्ध असेल. ही माहिती दिल्ली रणजी संघाचे प्रशिक्षक सरंदीप सिंह यांनी दिली आहे. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान चालणार हा सामना दिल्ली विरुद्ध रेल्वे या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना कुठे खेळला जाणार आहे याची घोषणा बीसीसीआयकडून केली गेली नाहीये. पण, मोठ्या खेळाडूंची उपस्थिती पाहता हा सामना दिल्लीच्या 'अरुण जेटली क्रिकेट ग्राउंड'वर आयोजित केला जाणार अश्या शक्यता आहेत. हे मैदान विराट कोहलीचं 'होम ग्राउंड'देखील आहे.  दिल्लीचा संघ एलिट 'डी' गटामध्ये असून, हा सामना रणजी करंडकाचा सहाव्या फेरीचा सामना आहे.  

विराट कोहली शेवटचा रणजी सामना  2  नोव्हेंबर 2012ला खेळला होता. हा सामना दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश असा होता. या सामन्याला  विराट कोहली, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, आशिष नेहरा, इशांत शर्मा आणि मोहम्मद कैफ या सर्व मोठ्या खेळाडूंची उपस्थिती होती. हा सामना उत्तर प्रदेश संघ  सहा विकेट्स राखून  जिंकला होता. मुख्य म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा शेवटचा रणजी सामना 27 ऑक्टोबर 2013 ला खेळला होता. म्हणजेच सचिन तेंडुलकरचा शेवटचा सामना हा विराट कोहलीच्या शेवटच्या रणजी सामन्याच्या जवळपास एक वर्ष नंतर होता. सचिनने  2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीदेखील घेतली होती. 

विराट कोहली सोबत रोहित शर्मा, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलदेखील आपापल्या संघासाठी रणजी करंडक खेळताना दिसणार आहेत. भारतीय घरेलू क्रिकेटला याचा फायदा नक्कीच होणार आहे. 'स्टार' खेळाडूंची उपस्थिती प्रेक्षक वर्गाला सामना बघण्यासाठी आकर्षित करेल. या सामन्यांसाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असतील अशी अशा आहे. 


सम्बन्धित सामग्री