Hulk Hogan Passes Away: रेसलिंग जगतातील सुप्रसिद्ध दिग्गज हल्क होगन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने रेसलिंग विश्वात शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी त्यांना आरोग्य समस्या जाणवत होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हल्क होगन काळाच्या पडद्याआड -
हल्क होगन 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांच्या कुस्ती आणि व्यक्तिमत्त्वामुळे घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 11 ऑगस्ट 1953 रोजी जॉर्जिया येथील ऑगस्टा शहरात जन्मलेले होगन हे रेसलिंगच्या इतिहासातील सर्वोच्च दिग्गजांपैकी एक होते.
हेही वाचा - पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर; ऋषभ पंत अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतून बाहेर
WWE कडून हल्क होगनला श्रद्धांजली -
WWE ने अधिकृत निवेदन जारी करत होगन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून, त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि जगभरातील चाहत्यांना शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. WWE ने म्हटलं आहे की, हल्क होगन यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी 80 च्या दशकात WWE ला जागतिक ओळख मिळवून दिली.
हेही वाचा - ICC चा मोठा निर्णय! भारताऐवजी 'या' देशात रंगणार कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना
दरम्यान, हल्क होगन यांनी 1996 मध्ये NWO (न्यू वर्ल्ड ऑर्डर) स्थापन करून स्वतःला एक नवीन आयाम दिला. यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंग (WCW) च्या लोकप्रियतेचा एक नवीन युग सुरू झाले. 2015 मध्ये वांशिक टिप्पणी असलेले एक रेकॉर्डिंग लीक झाल्यानंतर, त्यांना तात्पुरते हॉल ऑफ फेममधून वगळण्यात आले, मात्र कायदेशीर लढाईनंतर त्यांनी पुनरागमन केले. सुरुवातीच्या काळात, होगन पाच वेळा WWF चॅम्पियन होता. तथापी, सलग रॉयल रंबल सामने जिंकणारा तो पहिला कुस्तीगीर होता. हल्क होगन यांचा मृत्यू म्हणजे रेसलिंगच्या एका युगाचा अंत आहे.