Monday, September 01, 2025 06:30:44 PM

भारतात बंदी घातलेल्या 36 चिनी अ‍ॅप्सना वापरण्यास परवानगी; यात TikTok चा समावेश आहे का? जाणून घ्या

200 बंदी घातलेल्या अॅप्सपैकी 36 अॅप्स आता पुन्हा गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. यापैकी काही अ‍ॅप्स त्यांच्या जुन्या नावांसह परत आले आहेत.

भारतात बंदी घातलेल्या 36 चिनी अ‍ॅप्सना वापरण्यास परवानगी यात tiktok चा समावेश आहे का जाणून घ्या
Banned Chinese Apps Comeback In India
Edited Image

Banned Chinese Apps Comeback In India: भारत सरकारने 2020 मध्ये, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. गलवान खोऱ्यात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते. तथापि, आता भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंध सुधारत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पूर्वी बंदी घातलेले काही चिनी अॅप्स नवीन नावे आणि ओळखींसह भारतात परतले आहेत. तथापि, भारतात अजूनही टिकटॉकवर बंदी आहे आणि ते परत येण्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे नाहीत.

200 हून अधिक चीनी अॅपवर भारतात बंदी - 

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, 200 बंदी घातलेल्या अॅप्सपैकी 36 अॅप्स आता पुन्हा गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. यापैकी काही अ‍ॅप्स त्यांच्या जुन्या नावांसह परत आले आहेत, तर काहींनी त्यांचे लोगो आणि नावे बदलली आहेत. हे अ‍ॅप्स गेमिंग, कंटेंट क्रिएशन, एंटरटेनमेंट, फाइल शेअरिंग आणि शॉपिंग अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मोडतात. यापैकी बहुतेक अ‍ॅप्स नोव्हेंबर 2020 नंतर पुन्हा उपलब्ध झाले आहेत.

हेही वाचा - लहान मुलांसाठी विमान तिकिटाचे 'हे' नियम तुम्हाला माहित आहेत का? किती वयाची मुलं करू शकतात तिकिटाशिवाय प्रवास? जाणून घ्या

कोणत्याला अॅप्सला मिळाली भारतात वापरण्यास परवानगी - 

परत येणाऱ्या काही लोकप्रिय अॅप्समध्ये झेंडर (फाइल-शेअरिंग), युकू (स्ट्रीमिंग), ताओबाओ (शॉपिंग) आणि टँटन (डेटिंग) यांचा समावेश आहे. अहवालात असे म्हटले आहे की मँगोटीव्ही कोणत्याही बदलाशिवाय परत आले आहे, तर इतरांनी त्यांच्या नावांमध्ये किंवा मालकीच्या तपशीलांमध्ये किरकोळ बदल केले आहेत. जून 2020 मध्ये बंदी घालण्यात आलेले झेंडर आता अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर 'झेंडर: फाइल शेअर म्युझिक' या नावाने उपलब्ध आहे. 

हेही वाचा - वाढत्या UPI फसवणुकीपासून वाचण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

दरम्यान, ताओबाओ अॅप आता 'मोबाइल ताओबाओ' म्हणून सूचीबद्ध आहे. तथापी, 36 अॅप्सपैकी 13 चिनी कंपन्यांनी, आठ भारतीयांनी, तीन सिंगापूरने, दोन व्हिएतनामने आणि दक्षिण कोरिया, सेशेल्स, जपान आणि बांगलादेशमधील प्रत्येकी एका कंपनीने विकसित केले आहेत. काही अ‍ॅप्सनी त्यांची मालकी बदलून किंवा भारतीय कायद्यांचे पालन करून पुन्हा प्रवेश केला आहे. रिलायन्ससोबतच्या परवाना कराराद्वारे फॅशन अॅप शीन पुन्हा एकदा भारतात परतले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री