भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या राजनैतिक तणावादरम्यान देशात फास्ट-फॅशन जायंटच्या ॲपवर बंदी घालण्यात आल्याच्या जवळपास पाच वर्षांनंतर ईशा अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलने भारतात 'शीन'चे पुन्हा एकदा लाँचिंग केलं आहे. हा ब्रँड जगभरातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन कपडे विक्रेत्यांपैकी एक बनला आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतातील फॅशन अॅप्समध्ये शीनची खूप लोकप्रियता होती. पण 2020 मध्ये गलवान व्हॅली वादानंतर जेव्हा टिकटॉकसह 50 हून अधिक चिनी अॅप्सवर भारतीय बाजारपेठेत बंदी घालण्यात आली तेव्हा शीन देखील त्याच्या तावडीत सापडले.
हेही वाचा - Infosys ने 'हे' कारण देत शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ!
रिलायन्स रिटेलसोबत केली भागीदारी -
पाच वर्षांच्या बंदीनंतर, शीन अॅप पुन्हा एकदा भारतात परतले आहे. यावेळी रिलायन्स रिटेल या महाकाय कंपनीसोबत झालेल्या करारानंतर शीनचा भारतात प्रवेश शक्य झाला आहे. भारतात शीनवर बंदी घालण्यात आली असली तरी जागतिक बाजारपेठेत त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. आता रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी केल्यानंतर, ते पुन्हा एकदा भारतात लाँच करण्यात आले आहे. अलीकडेच, शीनने रिलायन्स रिटेलच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म अजिओवर त्यांच्या संग्रहाची चाचणी आणि कॅटलॉगिंग सुरू केले होते.
हेही वाचा - झोमॅटोचे नाव बदलणार! आता 'या' नावाने ओळखली जाणार कंपनी
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे शीन अॅप -
शीन अॅप सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी अॅपल अॅप स्टोअरवर आणि अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप नुकतेच लाँच झाले आहे. लाँच झाल्यानंतर लाखो लोकांनी ते डाउनलोड केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, हे अॅप दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
शीनवरील बंदीचा इतर शॉपिंग अॅपला झाला फायदा -
शीनच्या बंदीमुळे मीशो आणि मिंत्रा सारख्या प्लॅटफॉर्मना खूप फायदा झाला. आता शीन पुन्हा एकदा परतले आहे. त्यामुळे मीशो आणि मिंत्रा यासारख्या शॉपिंग अॅपमध्ये पुन्हा स्पर्धा वाढणार आहे. शीन अॅप सध्या फक्त काही शहरांमध्येच सेवा देत असून लवकरच ते संपूर्ण देशात त्यांची सेवा सुरू करण्यार आहे.