Independence Day 2025: यावर्षी 15 ऑगस्ट 2025 रोजी भारत 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या दिवशी देशभरात उत्साहाचे वातावरण असेत. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष असते. दरवर्षी हजारो लोक लाल किल्ल्याला भेट देऊन स्वातंत्र्यदिन साजरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि देशवासियांना प्रेरणादायक भाषण देतात. हे दृश्य ऐतिहासिक आणि देशभक्तीने नटलेले असते. जर तुम्हाला यंदा हा उत्सव जवळून अनुभवायचा असेल, तर तुम्हाला लाल किल्ल्याच्या कार्यक्रमासाठी तिकीट बुक करणे आवश्यक आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या जवळजवळ 200 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून लाल किल्ल्यावर दरवर्षी मुख्य स्वातंत्र्यदिन कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि सामान्य जनतेचे मोठे यशस्वी योगदान असते. जर तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर वेळेवर तिकीट बुक करणे फार महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंग
तुम्ही 13 ऑगस्टपासून, तुम्ही संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइट aamantran.mod.gov.in (https://aamantran.mod.gov.in किंवा e-invitations.mod.gov.in, (https://e-invitations.mod.gov.in) ला भेट देऊन सहजपणे तिकिटे बुक करू शकता.
तिकीट बुक करण्याची पद्धत-
-वरील वेबसाइटवर जा आणि स्वातंत्र्य दिन 2025 कार्यक्रमासाठी तिकीट बुकिंग पर्याय निवडा.
- तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि किती तिकीट हवे आहेत ते भरा.
- आधार कार्ड किंवा वैध ओळखपत्र स्कॅन करून अपलोड करा.
- तिकीटाची किंमत निवडा: जनरल (20 रुपये), स्टँडर्ड (100 रुपये), प्रीमियम (500 रुपये).
- ऑनलाइन पेमेंट (डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI) करा.
- पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला ई-तिकीट प्राप्त होईल ज्यामध्ये क्यूआर कोड आणि सीट नंबर असतील. या तिकीटाचा प्रिंटआउट किंवा मोबाइलवर स्क्रीनशॉट ठेवणे आवश्यक आहे.
हेही वाचा - यंदा स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील 50 स्वच्छता कर्मचारी असणार लाल किल्ल्यावर ''विशेष पाहुणे''
ऑफलाइन तिकीट कसे मिळवायची?
जर तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुकिंग करणे अवघड वाटत असेल, तर 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान दिल्लीतील निवडक सरकारी इमारती आणि काउंटरवर जाऊन तिकीट काढता येते. मात्र तिकीटांची मागणी खूप जास्त असल्यामुळे, आधीच तिकीट घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा - Independence Day 2025: 2025 मध्ये नेमका कितवा स्वातंत्र्यदिन साजरा होणार? 78 वा की 79 वा? जाणून घ्या
लाल किल्ल्यावर कसे पोहोचायचे?
15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर कार्यक्रम सकाळी 7:30 वाजता सुरू होतो, त्यामुळे तुम्ही किमान 6:30 ते 7:00 दरम्यान लाल किल्ल्यावर पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी दिल्ली मेट्रो हा सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. लाल किल्ल्याजवळील जवळचे मेट्रो स्टेशन म्हणजे ‘लाल किल्ला’ आणि ‘चांदणी चौक’. दिल्लीत 15 ऑगस्टला मेट्रो सकाळी 4:00 वाजता सुरू होईल, त्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी काही अडचण येणार नाहीत. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव लाल किल्ल्यावर जावून अनुभवणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असतो. त्यामुळे लवकर तुमचे तिकीट बुक करा आणि 15 ऑगस्टच्या या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान मोदींचे भाषण थेट ऐका.