Thursday, August 21, 2025 02:07:03 AM

कोईम्बतूरमधील AI Startup ने 140 कर्मचार्‍यांना दिला 14 कोटींचा बोनस, 2030 पर्यंत 'हे' लक्ष्य

Kovai.co हे स्टार्टअप सध्या वर्षाला 15 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवत आहे आणि सध्या याची मूल्य 100 दशलक्ष डॉलर इतकं असल्याचे सरवणकुमार यांनी सांगितले.

कोईम्बतूरमधील ai startup ने 140 कर्मचार्‍यांना दिला 14 कोटींचा बोनस 2030 पर्यंत हे लक्ष्य

कोईम्बतूर : देशात सध्या अनेक नवीन स्टार्टअप्स सुरू होताना दिसत आहेत. पण यापैकी खूप कमी स्टार्टअप यशस्वी होतात. तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका स्टार्टअपने थोड्या काळात यश मिळवून दाखवलं आहे. कोवाई.को (Kovai.co) असं या स्टार्टअपचं नाव आहे. हे स्टार्टअप सरवणकुमार यांनी 2011 मध्ये सुरू केलं होतं. स्थापनेच्या चौदा वर्षांनंतर सरवणकुमार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या नफ्यातले 14 कोटी रुपये बोनस म्हणून दिले आहेत.

या स्टार्टअपचे संस्थापक सरवणकुमार हे मूळचे कोईम्बतूरचे आहेत. या शहराला कोवाई असेही म्हटले जाते. कोईम्बतूर या शहराच्या नावावरूनच त्यांनी स्टार्टअप कंपनीचे नाव ठेवण्यात आले आहे. हे एक असं स्टार्टअप आहे बिझनेस-टू-बिझनेस SaaS सोल्यूशन्स पुरवते.

हेही वाचा - जंगलात शिकारीला गेले अन् सहकाऱ्याचीच केली शिकार, रानडुक्कर समजून झाडली गोळी

कंपनीचे संस्थापक सरवणकुमार हे 25 वर्षांपूर्वी लंडनला निघून गेले होते. “मी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ एक रेग्युलर आयटीमध्ये नोकरी करणारा व्यक्ती होतो, पण मला मार्केटमध्ये एक संधी दिसली आणि मी हे स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे पूर्णपणे बूटस्ट्रॅप्ड (bootstrapped) आहे आणि आम्ही बाहेरून कोणतीही फंडिंग घेतलेली नाही,” असे त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - Viral News: 'या' कारणाने मुलाच्या कुटुंबीयांनी थांबवला विवाह, मग काय.. नवरीने थेट पोलिसांनाच बोलावलं

Kovai.co हे स्टार्टअप सध्या वर्षाला 15 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवत आहे आणि सध्या याची मूल्य 100 दशलक्ष डॉलर इतकं असल्याचे सरवणकुमार यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं वचन पूर्ण केलं आणि 140 कर्मचाऱ्यांना 14 कोटींचा बोनस दिला.

Kovai.co या कंपनीचे 48 वर्षीय सीईओ हे बहुतांश वेळ लंडनमध्ये राहतात आणि त्यांचे 250 कर्मचारी हे कोईम्बतूर येथून काम करतात. 2030 पर्यंत कंपनीचे उत्पन्न 100 दशलक्ष डॉलरवर घेऊन जाण्याचं आपलं स्वप्न असून त्या गोष्टी त्या दिशेने जात आहेत, असे सीईओ म्हणाले.
 


सम्बन्धित सामग्री