Govt Facilities On WhatsApp
Edited Image
Govt Facilities On WhatsApp: इन्स्टंट मेसेजिंगसाठी व्हॉट्सअॅप हे सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. याशिवाय, या अॅपचा व्हॉइस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देखील याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आता लवकरच बस तिकिटे बुक करणे आणि प्रमाणपत्रे डाउनलोड करणे यासारखी अनेक महत्त्वाची कामेही व्हॉट्सअॅपद्वारे होणार आहेत. जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप लाखो वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये आणणार आहे.
सरकारची मेटाशी हातमिळवणी -
व्हॉट्सअॅपच्या नवीन सेवा महाराष्ट्रातील वापरकर्त्यांसाठी असतील. खरंतर, महाराष्ट्र सरकारने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. यासाठी राज्य सरकारने मेटाशी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीद्वारे, सरकार राज्यात व्हॉट्सअॅप-आधारित नागरिक सेवा सुरू करेल. सरकारच्या या उपक्रमामुळे भविष्यात राज्यातील जनतेला मोठी मदत होणार आहे.
हेही वाचा - Smart Home Gadgets: स्मार्ट होम गॅजेट्सच्या वापराने तुमचे जीवन होईल अधिक सुलभ
'आपल सरकार' नावाचा चॅटबॉट -
मेटा आणि महाराष्ट्र सरकारच्या भागीदारीत, राज्यात आपल सरकार नावाचा एक नवीन चॅटबॉट सुरू केला जाईल. या चॅटबॉटच्या मदतीने, राज्यातील कोट्यवधी व्हॉट्सअॅप वापरकर्ते राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून सरकारी सेवांबद्दल माहिती मिळवू शकतील आणि त्या मिळवू शकतील. हे चॅटबॉट मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये लाँच केले जाईल.
टेक्स्ट आणि व्हॉइस कमांडसह करणार काम -
वापरकर्ते 'आपल सरकार' चॅटबॉटचा वापर टेक्स्ट फॉरमॅट तसेच व्हॉइस फॉरमॅटमध्ये करू शकतील. या चॅटबॉटद्वारे, वापरकर्ते त्यांच्या तक्रारींचे निराकरण करू शकतील आणि त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे डाउनलोड करू शकतील. याशिवाय, या चॅटबॉटद्वारे बस तिकिटे देखील बुक करता येतील.
हेही वाचा - मेटा AI साठी वेगळे अॅप लाँच करणार; ChatGpt आणि Gemini ला देणार टक्कर
सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार -
आपलं सरकार चॅटबॉटबद्दल माहिती देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ओपन सोर्स जेनएआय तंत्रज्ञानाच्या मदतीने, राज्य कोट्यवधी लोकांसाठी सरकारी सेवा चांगल्या आणि सोप्या करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मेटाशी भागीदारी करून राज्य सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू आहे.