Monday, September 01, 2025 08:57:12 AM

'या' दिवशी लोकांना UPI द्वारे व्यवहार करता येणार नाहीत; देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांना दिली माहिती

शनिवारी, 8 फेब्रुवारी रोजी बँकेचे UPI, RuPay क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग आणि TPAP तीन तास काम करणार नाहीत. या कालावधीत बँकेने सिस्टम देखभालीसाठी डाउनटाइम जाहीर केला आहे.

या दिवशी लोकांना upi द्वारे व्यवहार करता येणार नाहीत देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांना दिली माहिती
'या' दिवशी या ग्राहकांना UPI द्वारे व्यवहार करता येणार नाहीत
Edited Image

HDFC Bank UPI Downtime: तुम्ही बाहेर गेल्यानंतर अगदी चहापासून ते मॉलमधून कपडे खरेदीपर्यंत सर्वत्र UPI चा वापर करता. UPI द्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे जलद गतीने ट्रान्सफर केले जातात. यूपीआयने बँकिंग व्यवहारांमध्ये क्रांती घडवून आणली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना एक संदेश पाठवला आहे. बँकेने सिस्टम देखभालीमुळे त्यांच्या UPI सेवा काही काळ काम करणार नाहीत, असं सांगितलं आहे. काही काळासाठी एचडीएफसी ग्राहकांच्या UPI व्यवहारांसह अनेक सेवांवर परिणाम होणार आहे. शनिवारी, 8 फेब्रुवारी रोजी बँकेचे UPI, RuPay क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग आणि TPAP तीन तास काम करणार नाहीत. या कालावधीत बँकेने सिस्टम देखभालीसाठी डाउनटाइम जाहीर केला आहे.

हेही वाचा - स्मार्टफोन वापणाऱ्या लाखो यूजर्संना धोका! 28 अॅप्समध्ये आढळला SparkCat नावाचा धोकादायक व्हायरस

UPI कधी काम करणार नाही?

एचडीएफसी बँकेने सांगितले की, त्यांच्या यूपीआय सेवा 8 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12:00 ते पहाटे 03:00 वाजेपर्यंत काम करणार नाहीत. म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत या सेवांवर परिणाम होईल. परदेशात प्रवास करणाऱ्यांनी हे विशेषतः लक्षात घेतले पाहिजे. ते त्यांच्या गरजांसाठी काही रोख रक्कम त्यांच्याकडे ठेवू शकतात किंवा दुसऱ्या बँक खात्यातून इतर UPI सक्रिय ठेवू शकतात.

हेही वाचा - Countries Banning Deepseek: 'या' देशांनी घातली डीपसीकच्या वापरावर बंदी; काय आहे नेमकं यामागचं कारण? जाणून घ्या

या सेवांवर होणार परिणाम - 

  • एचडीएफसी बँकेचे चालू/बचत खाते
  • रुपे क्रेडिट कार्ड
  • एचडीएफसी मोबाईल बँकिंग अॅप 
  • एचडीएफसी बँकेद्वारे समर्थित थर्ड पार्टी अॅप प्रदाते
  • एचडीएफसी बँकेमार्फत व्यापारी यूपीआय व्यवहार

दरम्यान, बहुतेक बँका देखभालीसाठी काही तासांसाठी त्यांच्या डिजिटल सेवा वेळोवेळी बंद करतात. या काळात, देखभाल आणि सिस्टम अपग्रेड सारखी कामे केली जातात. सहसा यामुळे रात्री 3-4 तास सेवांवर परिणाम होतो. हा एक निश्चित डाउनटाइम आहे. विशेष म्हणजे, बँका त्यांच्या ग्राहकांना काही दिवस आधीच याबद्दल माहिती देतात.
 


सम्बन्धित सामग्री