AI म्हणजे काय?
AI हा असा आधुनिक तंत्रज्ञान आहे जे संगणकांना असे काम करण्याची परवानगी देते ज्यांना मानवी बुद्धिमत्तेची खूप गरज असते. AI हा एक असा आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. AI विविध कामे एकदम कमी वेळात योगय पद्धतीने पार पाडतात. जसं की भाषा समजून घेणे, डेटाचे विश्लेषण करणे, इत्यादी कामे करते.
AI चा रुग्णालय क्षेत्रात कशा प्रकारे वापर होतो?
(AI) प्रामुख्याने निदान अचूकता सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरले जाते, त्यासोबतच वैयक्तिकदृष्ट्या
उपचार योजना बनवण्यासाठी, प्रशासकीय प्रक्रिया व्यवस्थित करण्यासाठी, संभाव्य आरोग्य धोक्यांचा अंदाज लावण्यासाठी, इत्यादी.
AI चे 'हे' वैशिष्ट्य कसे ठरणार रुग्णालय क्षेत्रात फायदेशीर?
1. AI खऱ्या वेळेची सूचना देऊ शकते, रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासांवर आधारित अंतर्दृष्टी प्रदान करू शकते, त्यासोबतच AI रुग्णांचे वर्तमान लक्षणेदेखील प्रदान करू शकते, प्रयोगशाळेतील निकाल देऊ शकते आणि डॉक्टरांना माहितीपूर्ण उपचार निर्णय घेण्यासाठीदेखील AI मदत करू शकते.
2. रुग्णांच्या डेटांचे विश्लेषण करून AI संभाव्य गुंतागुंतींचा अंदाज लावण्यासाठी किंवा उच्च प्रमाणात जोखीम परिस्थितींचा अंदाजदेखील सहज लावू शकते.
3. AI वैयक्तिक रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण करून त्यासोबतच त्यांच्या गरजांनुसार योग्य ते उपचार योजना तयार करू शकते.
4. AI चॅटबॉट्स रुग्णांना वैयक्तिकदृष्ट्या आरोग्याची माहिती, वेळेत औषध घेण्यासाठी जागृत करणे, भेटीचे वेळापत्रकदेखील तयार करून देते.