Whatsapp Privacy: डिजिटल युगात WhatsApp हे संवादाचं सर्वात लोकप्रिय माध्यम बनलं आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, डिव्हाइस-लेव्हल सिक्योरिटी आणि प्रायव्हसी-फर्स्ट पॉलिसी अशा अनेक सुरक्षाविषयक वैशिष्ट्यांसह WhatsApp आपले युजर्स सुरक्षित असल्याचा दावा करतो. मात्र वास्तवात काहीवेळा चित्र वेगळंच असतं.
कल्पना करा, तुम्ही रात्री एखाद्या मित्राशी गप्पा मारत असताना अचानक तुमचे काही मेसेज वाचले गेलेले दिसतात, जे प्रत्यक्षात तुम्ही उघडलेच नाहीत. किंवा कॉल करताना अजब आवाज येतो, जणू तिसरा कोणी ऐकत आहे. हे चित्रपटासारखं वाटत असलं तरी अनेक युजर्ससाठी हे वास्तव झालं आहे.
WhatsApp किती सुरक्षित आहे?
WhatsApp ची सिक्योरिटी सिस्टम सर्वसामान्य हॅकिंगपासून संरक्षण करते, पण ती 100% फुलप्रूफ नाही. जर एखाद्याने तुमच्या मोबाईलमध्ये स्पायवेअर इंस्टॉल केलं, QR कोड स्कॅन केला किंवा फोनची फिजिकल अॅक्सेस मिळवली, तर तुमच्या चैट्स आणि कॉल्सची गुप्तता धोक्यात येऊ शकते.
कोणती लक्षणं असू शकतात?
मेसेज वाचले गेले दाखवतात पण तुम्ही उघडलेले नसतात.
फोन अचानक गरम होतो किंवा बॅटरी लवकर संपते.
WhatsApp Web वर अनोळखी डिव्हाइस लॉगिन झालेलं दिसतं.
अज्ञात नंबरवरून विचित्र लिंक किंवा मेसेज येतात.कॉलमध्ये इको किंवा बॅकग्राउंड आवाज ऐकू येतो.
हेही वाचा: आता स्मार्टफोनवरून बनवा भाडे करार; एका क्लिकवर मिळेल ई-स्टॅम्प पेपर, जाणून घ्या कसे..
WhatsApp सुरक्षित ठेवण्यासाठी 5 महत्त्वाचे उपाय
1. टू-स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा
WhatsApp > Account > Two-Step Verification वर जाऊन पासकोड सेट करा. त्यामुळे तुमचा अकाउंट दुसऱ्याच्या हातात जाणार नाही.
2. लिंक्ड डिव्हाइसेस तपासा आणि लॉगआउट करा
Settings > Linked Devices मध्ये जाऊन सर्व अनोळखी डिव्हाइस लगेच लॉगआउट करा.
3. मोबाईल नंबर बदला जर संशय वाटत असेल
जर सिम किंवा फोनशी छेडछाड झाली असेल, तर नंबर बदलणं हा सुरक्षित निर्णय ठरू शकतो.
4. लोकेशन शेअरिंग बंद करा
Settings > Privacy > Location या सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन शेअरिंग बंद करा, विशेषतः संशयास्पद परिस्थितीत.
5. फोन व WhatsApp अपडेट ठेवा
सुरक्षेसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आवश्यक असतात. प्रत्येक अपडेटमध्ये सुरक्षा बग्स दूर केलेले असतात.
अॅडिशनल उपाय: अँटी स्पायवेअर अॅप्स वापरा
Bitdefender, Norton, किंवा Malwarebytes यांसारखी अॅप्स स्पायवेअर शोधून त्याचं निवारण करण्यात मदत करतात.
WhatsApp वापरणं सुरक्षित असलं तरी थोडीशी बेफिकिरी तुमच्या प्रायव्हसीला धोक्यात टाकू शकते. त्यामुळे सतर्क राहणं, सेटिंग्ज वेळोवेळी तपासणं आणि योग्य उपाय करणं हे तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.