Thursday, August 21, 2025 06:13:45 AM

Iphone Alert: अ‍ॅपल डिव्हाइसेस वापरताय? मग 'हा' अलर्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा

Apple डिव्हाइसेसमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या असून CERT-In ने अलर्ट जारी केला आहे. युजर्सनी त्वरित सॉफ्टवेअर अपडेट करून सायबर हल्ल्यांपासून संरक्षण घ्यावे.

iphone alert अ‍ॅपल डिव्हाइसेस वापरताय मग हा अलर्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा

Iphone Alert: भारत सरकारच्या संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने (CERT-In) अ‍ॅपल युजर्ससाठी ताज्या आणि गंभीर स्वरूपाचा सायबर अलर्ट जारी केला आहे. अनेक अ‍ॅपल डिव्हाइसेसमध्ये उच्च गंभीरतेचे (High Severity) सुरक्षा बग्स आढळले आहेत. या त्रुटींचा वापर करून सायबर हॅकर्स तुमचा वैयक्तिक डेटा चोरू शकतात, डिव्हाइसवर नियंत्रण मिळवू शकतात आणि सिस्टम क्रॅशही करू शकतात.

कोणत्या डिव्हाइसेसना धोका?

CERT-In च्या CIVN-2025-0163 या रिपोर्टनुसार, या बग्सचा परिणाम पुढील अ‍ॅपल सॉफ्टवेअर वर्जन्सवर होऊ शकतो:

iPhones: iOS 18.6 च्या आधीचे वर्जन्स

iPads: iPadOS 17.7.9 आणि 18.6 च्या आधीचे वर्जन्स

MacBooks: macOS Sequoia (15.6 आधी), Sonoma (14.7.7 आधी), Ventura (13.7.7 आधी)

Apple Watch: watchOS 11.6 आधीचे

Apple TV: tvOS 18.6 आधीचे

Vision Pro: visionOS 2.6 आधीचे


या बग्समागे मुख्यतः मेमरी हँडलिंगमधील चुका, लॉजिक एरर्स आणि प्रिव्हिलेज मॅनेजमेंटमधील कमतरता जबाबदार आहेत.

संभाव्य धोके काय?

या सिक्योरिटी बग्सचा फायदा घेतल्यास, वापरकर्त्यांना खालील प्रकारच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो:

खाजगी आणि संवेदनशील माहितीची चोरी

रिमोटली कोड रन करून डिव्हाइसवर नियंत्रण मिळवणं

सिक्योरिटी फिचर्स बायपास करणं

सिस्टम क्रॅश किंवा Denial of Service (DoS) अटॅक्स

ओळख गमावणे आणि डेटा लॉस होण्याचा धोका

हे सर्व तुमच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं.

सुरक्षित कसं राहावं?

Apple ने या त्रुटी दूर करण्यासाठी आधीच OTA (Over-The-Air) अपडेट्स जारी केले आहेत. त्यामुळे सर्व युजर्सनी त्यांच्या iPhone, iPad, Mac आणि इतर डिव्हाइसेसवर त्वरित अपडेट करणे अत्यावश्यक आहे.

अपडेट कस करावा?

Settings > General > Software Update
या पर्यायात जाऊन उपलब्ध अपडेट डाउनलोड करा आणि डिव्हाइस रीस्टार्ट करा.

तुमचं iPhone, Mac किंवा इतर कोणतंही Apple डिव्हाइस सुरक्षित ठेवायचं असेल, तर या अलर्टकडे दुर्लक्ष न करता लगेच अपडेट करा. सायबर हल्ले ही आता कल्पनारम्य गोष्ट राहिलेली नाही, तर वास्तवात घडणारी गंभीर समस्या आहे. त्यामुळे डिजिटल सुरक्षितता राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे.

 


सम्बन्धित सामग्री