Thursday, September 04, 2025 12:04:21 AM

iPhone 16e: 16 सिरीज मधील परवडणाऱ्या किमतीत दमदार फीचर्ससह लाँच!

Apple ने अखेर iPhone 16e अधिकृतपणे लाँच केला आहे. 2025 मधील iPhone 16 सिरीजमधील हा सर्वात किफायतशीर फोन असून तो दमदार A18 चिप आणि Apple Intelligence तंत्रज्ञानासह येतो.

iphone 16e 16 सिरीज मधील परवडणाऱ्या किमतीत दमदार फीचर्ससह लाँच

Apple ने अखेर iPhone 16e अधिकृतपणे लाँच केला आहे. 2025 मधील iPhone 16 सिरीजमधील हा सर्वात फायदेशीर फोन असून तो दमदार A18 चिप आणि Apple Intelligence तंत्रज्ञानासह येतो.

iPhone 16e 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. याची किंमत ₹59,900 पासून सुरू होते. फेब्रुवारी 21 पासून प्री-ऑर्डर, तर फेब्रुवारी 28 पासून विक्री सुरू होणार आहे. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट रंगांमध्ये येईल, तसेच पाच वेगवेगळ्या रंगातील सिलिकॉन केससुद्धा उपलब्ध असतील. 

हेही वाचा: RAM म्हणजे काय? स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी याची चौकशी करणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या

दमदार परफॉर्मन्स आणि बॅटरी

Apple च्या नव्या A18 चिप च्या मदतीने iPhone 16e वेगवान कार्यप्रदर्शन देतो. या फोनमध्ये 6-कोर CPU आणि 4-कोर GPU आहे, जो iPhone 11 च्या A13 Bionic पेक्षा 80% वेगवान आहे. याशिवाय, Apple च्या C1 मॉडेममुळे हा फोन अधिक वेगवान आणि कमी बॅटरी वापरणारा आहे. iPhone 11 च्या तुलनेत 6 तास जास्त बॅटरी बॅकअप मिळतो.

डिझाईन आणि डिस्प्ले:
6.1-इंच Super Retina XDR Display असलेल्या या फोनमध्ये Ceramic Shield फ्रंट ग्लास असून, हा कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात मजबूत ग्लास असल्याचा दावा केला जातो.

कॅमेरा आणि फोटोग्राफी:

48MP फ्युजन कॅमेरा आणि 2x टेलिफोटो लेन्स च्या मदतीने उत्कृष्ट फोटो आणि 4K Dolby Vision व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. याशिवाय, Spatial Audio तंत्रज्ञानामुळे अधिक चांगला साउंड एक्सपीरियन्स मिळतो.

Apple Intelligence आणि नवीन AI फीचर्स: 
Apple Intelligence ची साथ मिळाल्याने हा फोन आणखी स्मार्ट ठरतो. Image Playground, Genmoji, Writing Tools यांसारखी AI फीचर्स त्यात आहेत. Siri आता अधिक हुशार असून, ChatGPT सह संवाद साधण्याचीही सुविधा मिळते.

हेही वाचा: तुम्ही सायबर फसवणुकीला बळी ठरले आहात का?...पण तक्रार कोठे कराची माहीत नाहीये का? ही बातमी ठरेल कामाची

अतिरिक्त फीचर्स
    •    IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टन्स
    •    Face ID आणि Action Button
    •    USB-C आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट
    •    मराठीसह 10 भारतीय भाषा अपडेट एप्रिलमध्ये

परवडणाऱ्या किमतीत दमदार परफॉर्मन्स, उत्तम कॅमेरा आणि स्मार्ट फीचर्स असलेला iPhone 16e हा ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरणार आहे!
 


सम्बन्धित सामग्री