पठ्ठ्यानं डोकं लावलं आणि पैसा कमावला; तासाभरात कमावतोय हजारो रूपये
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात दररोज कोट्यवधी भाविक गंगेत स्नानासाठी येत आहेत. सद्या प्रयागराजच्या सर्व बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं असून प्रयागराज भाविकांनी फुल्ल भरलेलं आहे. या महाकुंभात धार्मिक पर्वाच्या निमित्तानं स्थानिक तसेच बाहेरून आलेलेल अनेक लोक उदरनिर्वाहासाठी विविध व्यवसाय करताना दिसत आहेत. यात कुणी पूजेच्या वस्तू विकत आहे, कुणी प्रसाद, तर कुणी खाण्या-पिण्याचे गाडी लावत आहे तर कुणी इतर कामे करत आहेत. लोकं येथे विविध मार्गांनी कमाई करत आहेत.
महाकुंभ मेळ्यात काही दिवसांपूर्वी रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा चर्चेत आली. त्यानंतर दात घासण्याचे ब्रश विकणारा तरूण फेमस झाला. आता अशाच एका तरूणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो मोबाईल चार्जिंगच्या व्यवसायातून दर तासाला तब्बल 1000 रुपये कमावत आहे.
हेही वाचा - 'ही' ट्रेन गेल्या 75 वर्षांपासून देत आहे प्रवाशांना मोफत सेवा! काय आहे या रेल्वेचं नाव? जाणून घ्या
मोबाईल चार्जिंगचा अनोखा व्यवसाय
इन्स्टाग्रामवर @malaram_yadav_alampur01 या हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत हा तरुण रस्त्यावर बसून मोबाईल चार्जिंगची सेवा देताना दिसत आहे. त्याच्याकडे एकाच वेळी 20-25 मोबाईल चार्ज करण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक मोबाईल चार्जिंगसाठी तो एका तासाला 50 रुपये आकारत आहे. म्हणजेच एका तासात तो किमान 1000 ते 1250 रुपये कमावत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काहींनी तरुणाच्या कल्पकतेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी हे महागडं चार्जिंग असल्याची टीका केली आहे.
हेही वाचा - काय सांगता!! तिरुपतीचे लाडू विकून मंदिराला दरवर्षी मिळतात 'इतके' कोटी रुपये
मुकेश अंबानींनी कुटुंबासह त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं दररोज कोट्यवधी भाविक दाखल होत असून पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आज रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील महाकुंभमेळ्यात दाखल होत कुटुंबासह संगमावर पवित्र स्नान केलं. याआधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं होतं. तसंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महाकुंभमेळ्याला भेट देत संगमस्थानी पवित्र स्नान केलं होतं.