Wednesday, August 20, 2025 09:17:53 PM

Nanded: इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांनी दिला चोप

हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

nanded इसापूर धरण परिसरात तरुणांची हुल्लडबाजी पोलिसांनी दिला चोप

नांदेड: राज्यात सध्या पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून बऱ्याच जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशातच नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरात तरुण हुल्लडबाजी करताना पाहायला मिळाले आहेत. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरात तरुण हुल्लडबाजी करत आहेत. त्यामुळे इसापूर धरणावर हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. पैनगंगा नदीवरचे इसापूर धरण पूर्ण भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. या धरणावर धोकादायक परिसरात जाऊन काही युवक हुल्लडबाजी करत होते. युवकांच्या या हुल्लडबाजीमध्ये त्यांचाच जीव धोक्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या तरुणांना काठ्यांचा प्रसाद देत धरणावरून हाकलून लावलं. आता या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Pune Water Logging: पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ

तरुणांना पोलिसाने दिला चोप 
नांदेडमधील इसापूर धरण परिसराच्या ठिकाणी तरुण मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. या तरुणांना धरणाच्या ठिकाणाहून पोलीस हाकलताना दिसत आहेत. पोलीस आल्यानंतरही तरुण जोरजोरात हसताना पाहायला मिळाले. तसेच धरणाच्या पाण्याचे व्हिडीओ काढताना दिसत आहेत. पोलिसांने सांगूनही तरुण त्या ठिकाणाहून परत आले नसल्याने पोलिसांनी तरुणांना लाठीचा प्रसाद दिला आहे. एक ते दोन तरुणांना पोलिसांनी चोप दिल्यानंतर तरुणांची अख्खी टोळी पळत सुटली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 
  
नांदेडमध्ये पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त
नांदेडमध्ये पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. रावनगावातील अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. पुरामुळे संसार उपयोगी साहित्य खराब झाले आहे. रावनगावातील बहुतेक सगळ्याच घरांची पडझड झाली आहे. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. गृहपयोगी वस्तूही खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. 


सम्बन्धित सामग्री