पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मंगळवारी एक प्रवासी ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. बलूचिस्तानमधील स्वतंत्र गट बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, ट्रेनवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. गटाने केलेल्या दाव्यानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे सहा जवान ठार झाले असून, त्यानंतर 100 हून अधिक प्रवाशांना बंदी ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: Walmik Karad : तब्बल सहा वेळा वाल्मिक कराडने मागितली खंडणी; दोषारोप पत्रातून धक्कादायक माहिती आली समोर
काय आहे प्रकरण?
बलुच लिबरल आर्मीने जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या गटाने दिलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तान रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही ट्रेन हायजॅक करण्यात आली असून शेकडो प्रवासी यावेळी बंदी बनवले आहेत. मिळालेल्या अहवालानुसार, या दहशतवादी गटाने ट्रेनवर ताबा मिळवला असून किमान सहा सैन्य अधिकाऱ्यांना जीवे मारण्यात आलंय आणि उर्वरित 100 प्रवाशांना बंदी बनवण्यात आले आहे. या गटाच्या प्रवक्त्याने असेही सांगितले की ही कारवाई बीएलए माजीद ब्रिगेड फतेह स्क्वॉड आणि एसटीओएसकडून केली जात आहे. बीएलएने पुढे इशारा दिला आहे की जर कोणतीही लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला, तर सर्व बंदी बनवलेल्या प्रवाशांना ठार करण्यात येईल.
दरम्यान पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मंगळवारी एक प्रवासी ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. बलूचिस्तानमधील स्वतंत्र गट बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, ट्रेनवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. गटाने केलेल्या दाव्यानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे सहा जवान ठार झाले असून, त्यानंतर 100 हून अधिक प्रवाशांना बंदी ठेवण्यात आले आहे.