Wednesday, August 20, 2025 10:40:14 AM

'या' गावात 300 वर्षांपासून रक्षाबंधनाचा सण साजरा होत नाही; राखी पाहताचं पळून जातात गावातील लोक

या गावात गेल्या 300 वर्षांपासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाहीत. विवाहित महिला देखील हा सण साजरा करण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या घरी जात नाहीत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे

या गावात 300 वर्षांपासून रक्षाबंधनाचा सण साजरा होत नाही राखी पाहताचं पळून जातात गावातील लोक
Edited Image

Raksha Bandhan 2025: देशभरात रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि भावाच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात. मात्र उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील बेनीपूर चक गाव या सणापासून 300 वर्षांपासून दूर आहे. येथे गेल्या 300 वर्षांपासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाहीत. विवाहित महिला देखील हा सण साजरा करण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या घरी जात नाहीत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि आजही गावकरी त्याचे काटेकोरपणे पालन करतात.

राखी पाहून गावकरी काढतात पळ - 

संभळपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या बेनीपूर चक गावात रक्षाबंधन साजरा न करण्याचा नियम इतका कठोर आहे की, राखी दाखवली तरी लोक टाळाटाळ करून दूर निघून जातात. वडीलधारी सोरन सिंह आणि विजेंद्र सिंह सांगतात की, या परंपरेमागे त्यांच्या पूर्वजांची एक हृदयस्पर्शी पण त्यागमय कथा आहे. गावातील ज्येष्ठ जबर सिंह यांच्या मते, त्यांचे पूर्वज मूळचे अलीगढ जिल्ह्यातील अत्रौली तहसीलमधील सेमरा गावात राहत होते. तेव्हा यादव आणि ठाकूर या दोन समाजांचे कुटुंब एकत्र राहत होते. ठाकूर कुटुंबात मुलगा नसल्याने त्यांच्या मुली यादव समाजातील मुलांना दत्तक भाऊ मानून राखी बांधत असतं.

हेही वाचा - Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहीण-भावाला पाठवा 'या' खास शुभेच्छा आणि हृदयस्पर्शी मेसेज

त्यागाची आठवण जपण्यासाठी उत्सवावर बंदी - 

एकदा ठाकूर समाजातील एका मुलीने तिच्या दत्तक भावाला राखी बांधली आणि बदल्यात संपूर्ण गावाची जमीन मागितली. भावाने शब्द पाळत ती जमीन तिला दिली आणि गाव सोडले. त्यानंतर त्यांचे कुटुंब संभळमधील बेनीपूर चक येथे स्थायिक झाले. तथापी, गावातील वयोवृद्ध राजवीर यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांनी राखीच्या बदल्यात सर्व मालमत्ता दिली होती. हा त्याग इतका मोठा होता की, त्यानंतर लहानशी देणगी देणे देखील अपमानास्पद वाटते. म्हणूनच गावात रक्षाबंधन कायमचे बंद केले गेले. 

हेही वाचा - Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणींना या प्रकारच्या 5 भेटवस्तू नक्की द्या

गावाची ओळख बनली परंपरा - 

बेनीपूर चकमध्ये रक्षाबंधन न साजरा करणे हे आता फक्त एक नियम नाही, तर गावाची ओळख बनले आहे. येथील लोकांचा विश्वास आहे की, हा त्याग आणि वचनपालनाचा आदर्श आहे, जो पिढ्यानपिढ्या तसाच जपला पाहिजे.


सम्बन्धित सामग्री