Monday, March 03, 2025

तिजोरीत ‘या’ तीन गोष्टी कधीही ठेवू नका, नाहीतर धन दौलत कमी होईल.

Editor Name: Jaimaharashtra News

बऱ्याच वेळा काही लोकांची संपत्ती अचानक कमी व्हायला लागते. या मागचे कारण तुम्हाला माहिती आहे?

वास्तु शास्त्रानुसार माणसाच्या छोट्याशा चुकांमुळेही संपत्ती कमी होऊ शकते. असे म्हटले जाते कि आपल्या तिजोरीच्या ठिकाणी 3 गोष्टी ठेवल्याने हे होते.

वास्तुनुसार, मोफत मिळालेल्या वस्तू पैशांच्या तिजोरीत ठेवू नका अशा लोकांवर धनलक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा होत नाही.

पैसे ठेवत असणाऱ्या ठिकाणी फुकट मिळालेले कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा सौंदर्य प्रसाधने ठेवू नये. तुमची ही छोटीशी चूक घराला उद्धवस्त करू शकते.

चुकीची मार्गाने कमावलेला पैसा तुमची भरभराट कमी करतो. अशा पैशांना तिजोरीत ठेवल्याने घराची सुख- संपन्नता नाहीशी होऊ शकते.

चोरी, लूट किंवा फसवणुकीतून आलेला पैसा स्थिर राहत नाही. असा पैसा चांगल्या आणि वाईट वेळीही टिकत नाही.

ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार, काही लोक तिजोरीत आरसा लावतात. पैशांच्या तिजोरीत आरसा लावणे बरोबर आहे पण एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

वास्तु तज्ञ म्हणतात की पैशांच्या तिजोरीत लावलेला आरसा फुटला नाही पाहिजे. दुसर म्हणजे आरसा हा तेव्हाच लाभदायक असेल जेव्हा तो दक्षिण दिशेला असेल.