Wednesday, August 13, 2025

मनोरंजनाची पर्वणी! 15 ऑगस्टला घरबसल्या पाहा ''हे'' 6 चित्रपट

Editor Name: Jaimaharashtra News

मुंबई: 15 ऑगस्ट म्हणजे देशभक्तीचा उत्सव. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यादिवशी सुट्टी असल्याने काहीजण बाहेर जाऊन स्वातंत्र्यदिन साजरा करतात तर काहीजण घरी राहणे पसंत करतात.

या दरम्यान, काहीजण टीव्हीवर, लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर अनेक देशभक्तीपर चित्रपट पाहतात.

आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की, या दिवशी कोणते देशभक्तीपर चित्रपट पाहायचे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

1 - हॉलिडे: हा चित्रपट एका लष्करी अधिकाऱ्याच्या अवती-भवती फिरतो, जो सुट्टीवर असताना मुंबई शहराला दहशतवादी हल्ला होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो.

2 - शेरशाह: हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन बत्राची भूमिका साकारला आहे.

3 - उरी: द सर्जिकल स्ट्राइक: या चित्रपटात विक्की कौैशलने एका सैनिकाची भूमिका साकारली आहे, ज्यात भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची कथा दाखवण्यात आली आहे

4 - चक दे इंडिया: या चित्रपटात शाहरूख खानने महिला हॉकी संघाच्या कॅप्टनची भूमिका साकारली आहे, जो महिला हॉकी संघाला यश मिळवून देण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करतो.

5 - राझी: हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात एक भारतीय मुलगी पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत लग्न करते आणि पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून जाते.

6 - बॉर्डर: हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, लोंगेवाला येथे झालेल्या लढाईवर आधारित आहे. यात, भारतीय जवानांनी केलेले शौर्य आणि बलिदान दाखवण्यात आले आहे.