Monday, August 11, 2025

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्हाला सुद्धा स्पेशल लूक करायचा आहे का? जाणून घ्या

Editor Name: Jaimaharashtra News

मुंबई: 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

या दरम्यान, अनेकांना हा प्रश्न पडतो की यादिवशी कोणता ड्रेस परिधान करायचं? चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया.

तीन रंगांचा दुपट्टा: यादिवशी पांढरा कुर्त्यासह, पांढरा आणि हिरव्या रंगांची ओढणी परिधान करणे ही चांगली कल्पना आहे.

तिरंग्याशी जुळणारा सूट: तिरंग्याशी जुळणारा सूट परिधान करून ऑफिसला जाण्यासाठी सुंदर पोशाख आहे.

तीन रंगाची साडी: तिरंग्याचे प्रतीक म्हणून या दिवशी तीन रंगांची साडी परिधान करणे चांगला पर्याय आहे.

हिरवा दुपट्टा असलेला पांढरा सूट: जर तुम्हाला काहीतरी नवीन लूक करायचे असेल तर हिरव्या दुपट्ट्यासह, पांढरा सूट परिधान करा.