रामदेवबाबा यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये रामदेवबाबा यांनी व्हिडिओमध्ये म्हणाले की, ''लठ्ठपणामुळे गुडघेदुखी होते, पाठदुखी होते, लठ्ठपणामुळे शुगरही होते.''
''लठ्ठपणामुळे पोटावर जास्त वजन वाढते आणि स्वादुपिंडावर (Pancreas) दबाव येतो, त्यामुळे स्वादुपिंडाच्या (Pancreas) बीटा पेशींचा ऱ्हास होतो आणि साखर वाढते.''
''लठ्ठपणामुळे हृदयाच्या समस्या निर्माण होतात कारण त्यामुळे हृदयावर दबाव पडतो. लठ्ठ लोकांचे कोलेस्ट्रॉलही वाढते आणि त्यांना फॅटी लिव्हरची समस्याही असते.''
''लठ्ठ व्यक्तींना हृदयविकाराचा झटका लवकर येतो. ब्रेन हॅमरेज आणि थायरॉईडचा त्रास होतो.''
'लठ्ठ असणाऱ्यांनी योगाभ्यास करावा. भात यासारख्या धान्याचे सेवन करणे टाळा. ज्यांना निरोगी आयुष्य जगायचे आहे, त्या प्रत्येकासाठी हे महत्त्वाचे आहे.
''लठ्ठ लोकांनी गहू आणि तांदूळ यासारख्या धान्याचे सेवन कमी करावे. त्याऐवजी शेकडो गोष्टी खायला मिळतात. भाज्या, कडधान्ये, सूप, सॅलड, फळे आहेत.
'लठ्ठपणामध्ये योगाभ्यास खूप महत्त्वाचा आहे. गिलॉय हे लठ्ठपणावर रामबाण उपाय आहे.'
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बाबा रामदेव यांनी वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांना बाजरी, मूग, तीळ खाण्याचा सल्ला दिला आहे.
बाबा रामदेव म्हणाले, ''दुधी भोपळाचा रस प्या आणि अश्वगंधाची 3-3 पाने सकाळी आणि संध्याकाळी खावे.''
पुढे रामदेव बाबा म्हणतात, ''याचे नियमित सेवन केल्याने एका महिन्यात 15 ते 20 किलो वजन कमी होऊ शकते.''
''3 महिन्यांत अंदाजे 40-50 किलो वजन कमी होते. अशी अनेक माणसे आपण पाहिली आहेत'', असे रामदेव बाबा म्हणाले.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)