Thursday, February 20, 2025

उन्हाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी?

Editor Name: Jaimaharashtra News

या सोप्या टिप्स तुमच्या बागेला टिकवतील हिरवेगार!

सावली द्या: ग्रीन शेड नेट वापरा किंवा झाडांभोवती सावली निर्माण करा.

योग्य पाणी व्यवस्थापन: सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी द्या, थेट उन्हात टाकू नका.

मल्चिंगचा वापर: माती ओलसर राहण्यासाठी पालापाचोळा किंवा गवताने झाडांच्या भोवती मल्चिंग करा.

गरम वाऱ्यापासून संरक्षण: मोठ्या झाडांच्या मदतीने किंवा भिंतींच्या साहाय्याने झाडांना गरम वाऱ्यापासून वाचवा.

थोडेसे प्रयत्न आणि योग्य नियोजन केल्यास उन्हाळ्यातही तुमची बाग टवटवीत आणि फुलांनी भरलेली राहील.

तुमच्या बागेसाठी या टिप्स उपयुक्त वाटल्या का? कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा!