Friday, September 05, 2025 10:07:06 PM

Earthquake Strikes Tibet: तिबेटला 3.8 तीव्रतेचा भूकंप; कोणत्याही नुकसानाची नोंद नाही

NCS च्या अहवालानुसार भूकंपाचे केंद्रबिंदू 34.01° उत्तर अक्षांश आणि 81.90° पूर्व रेखांश येथे असून, जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता.

earthquake strikes tibet तिबेटला 38 तीव्रतेचा भूकंप कोणत्याही नुकसानाची नोंद नाही

Earthquake Strikes Tibet: राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे तिबेटमध्ये 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला. हा धक्का भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:50 वाजता जाणवला. NCS च्या अहवालानुसार भूकंपाचे केंद्रबिंदू 34.01° उत्तर अक्षांश आणि 81.90° पूर्व रेखांश येथे असून, जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता.

हेही वाचा - India Support Ukraine : युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी भारत पाठिंबा देण्यास तयार; राजदूत पी. ​​हरीश यांचं वक्तव्य

तिबेट पठार हे टेक्टोनिक हालचालींसाठी ओळखले जाते. भारतीय टेक्टोनिक प्लेट सतत युरेशियन प्लेटकडे सरकत असल्यामुळे या भागात भूकंप वारंवार होतात. या टक्कर प्रक्रियेमुळेच हिमालय पर्वतरांग उंचावली आहे. तिबेट आणि नेपाळ एका मोठ्या भूगर्भीय फॉल्ट लाइनवर आहेत जिथे भारतीय टेक्टोनिक प्लेट युरेशियन प्लेटमध्ये ढकलली जाते आणि त्यामुळे भूकंप नियमित होतात. 

हेही वाचा Cyber Attack On USA: अमेरिका सायबर हल्ल्याच्या चक्रात, ट्रम्प आणि JD वेंससह लाखो कॉल्स आणि फाईल्स गेल्या चोरीला; थेट चीनवर आरोप

तज्ज्ञांच्या मते, तिबेट प्रदेश स्ट्राइक-स्लिप आणि सामान्य फॉल्टिंग यंत्रणेशी संबंधित असून येथे 5.0 ते 7.0 तीव्रतेचे भूकंप अनेकदा नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे, 2008 मध्ये या पठारावर 5.9 ते 7.1 तीव्रतेचे पाच भूकंप झाले होते. तिबेट हा भूकंपप्रवण प्रदेश असून टेक्टोनिक हालचालींमुळे या भागातील भूगर्भीय अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जाते.


सम्बन्धित सामग्री