World's Most Expensive Pet Dog
Instagram
World's Most Expensive Pet Dog: कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र असतो. कुत्रे हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राण्यांपैकी एक आहेत. मानव देखील कुत्र्यांवरील प्रेम व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत. अनेक लोकांना कुत्रे पाळण्याची इतकी आवड असते की ते सर्वात महागडे कुत्रे विकत घेतात आणि त्यांना घरी आणतात. अलीकडेच, अशाच एका कुत्र्यांच्या शौकीन व्यक्तीने जगातील सर्वात महागडा पाळीव कुत्रा खरेदी केला. हा कुत्रा इतका महाग आहे की, तुम्ही या किंमतीत अनेक बंगले खरेदी करू शकता किंवा एखादा मोठा उद्योग सुरू करू शकता.
जगातील सर्वात महागडा कुत्रा -
जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणारा हा व्यक्ती भारतीय असून त्याचे नाव एस सतीश आहे. 51 वर्षीय सतीश कुत्र्यांचा इतका मोठा चाहता आहे की त्याने आपला छंद पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी केला. ज्याची किंमत 50 कोटी रुपये आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, सतीशने फेब्रुवारी 2025 मध्ये कॅडाबॉम्ब ओकामी नावाचा एक दुर्मिळ कुत्रा 'वुल्फडॉग' 50 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
हेही वाचा - श्रद्धेत असीम ताकद असते! आईची प्रार्थना देवाने ऐकली अन् मुलाचा काळ मागे फिरवला, Video Viral
सतीशकडे 150 हून अधिक दुर्मिळ कुत्र्यांच्या जाती -
कुत्रा खरेदी केल्यानंतर सतीश म्हणाला की, 'मी हा कुत्रा खरेदी करण्यासाठी 50 कोटी रुपये खर्च केले. कारण मला कुत्र्यांबद्दल खूप आवड आहे आणि मला अनोखे कुत्रे पाळायला आणि त्यांना भारतात आणायला आवडते. ओकामी व्यतिरिक्त, सतीशकडे 150 हून अधिक कुत्र्यांच्या जाती आहेत ज्या बेंगळुरूमध्ये सात एकर जमिनीवर राहतात आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सहा लोकांना कामावर ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - OMG! पोटदुखीने त्रस्त असलेल्या तरुणाने युट्यूब पाहून केली स्वतःवरचं शस्त्रक्रिया; प्रकृती गंभीर
'वुल्फडॉग' दररोज 3 किलो मांस खातो -
सतीशने अलीकडेच खरेदी केलेल्या दुर्मिळ कुत्र्याचे गुण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. द सनच्या रिपोर्टनुसार, कॅडाबॉम्ब ओकामी नावाचा हा कुत्रा अशा प्रकारचा पहिलाच आहे आणि तो अत्यंत दुर्मिळ कुत्रा आहे. ही एक 'लांडग्याच्या कुत्र्याची' जात आहे. नावाप्रमाणेच, हा कुत्रा लांडगा आणि कॉकेशियन शेफर्डचा संकर आहे, म्हणूनच त्याला 'वुल्फडॉग' असं नाव देण्यात आलं आहे. सतीशने विकत घेतलेला कुत्रा अमेरिकेत जन्मला होता आणि सध्या तो सुमारे आठ महिन्यांचा आहे. तो दररोज सुमारे 3 किलो मांस खातो.