CHIKV virus outbreak in China प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
बीजिंग: चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं होतं. जगभरात या विषाणूचा उद्रेक झाला होता. आताच्या घडीला देखील अनेक देश कोरोना विषाणूला तोंड देत आहेत. आता चीनमधून बातम्या येत आहेत की, तेथे आणखी एका विषाणूमुळे आरोग्य मंत्रालयाला आपत्कालीन मोहीम जारी करावी लागली. चीनच्या अनेक जिल्ह्यांमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या CHIKV विषाणूचा हजारो लोकांना संसर्ग झाला आहे. या विषाणूमुळे तीव्र ताप येत आहे.
चीनमध्ये CHIKV विषाणूचा उद्रेक -
या विषाणूच्या वेगाने पसरल्यामुळे चीनच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, लोकांना जागरूक केले जात आहे. तथापी, चीनचा शेजारील देश हाँगकाँगमध्ये या विषाणूबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण चीनच्या फोशान शहरात चिकनगुनिया ताप वेगाने पसरत आहे. चीनमधील शुंडे येथील स्थानिक आरोग्य संस्थेने माहिती दिली की येथे चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत या भागात चिकनगुनियाच्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 1161 वर पोहोचली आहे.
चीनमधील शुंडे, लेकोंग, बेजियाओ, चेनकुन, नानहाई आणि चानचेंग येथेही या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा -देशभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; केरळ, महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण
जगभरात 2 लाखाहून अधिक रुग्ण -
आतापर्यंत जगभरात 2 लाखांहून अधिक चिकनगुनिया रुग्ण आढळले आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) माहिती दिली आहे.
हेही वाचा - नवी मुंबईत कोरोनाचे 19 रुग्ण; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
CHIKV विषाणू म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, चिकनगुनिया हा CHIKV विषाणू आहे. तो डासांद्वारे पसरतो. यामुळे शरीराच्या सांध्यामध्ये वेदना आणि तापाची समस्या निर्माण होते. ताप आणि वेदना खूप जास्त असतात. यामुळे रुग्णाची स्थिती अनेक वेळा गंभीर होते. CHIKV विषाणू मादी डासांद्वारे पसरतो. त्यामुळे तापासोबत सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.