Wednesday, August 20, 2025 09:34:53 AM

रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले

सायबेरियन अंगारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या टेकडीच्या तळाशी सापडले आहेत.

रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले
Russia Plane Crash
Edited Image

Russia Plane Crash: अहमदाबाद अपघातानंतर आता रशियामधून विमान अपघातासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. रशियामध्ये एक प्रवासी विमान क्रॅश झाल्याचे वृत्त आहे. या विमानाचा जळणारा अवशेष सापडला आहे. डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, सायबेरियन अंगारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या टेकडीच्या तळाशी सापडले आहेत. अपघाताची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी, सापडलेल्या अवशेषांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अमुर प्रदेशाचे गव्हर्नर वसिली ऑरलोव्ह यांनी विमान बेपत्ता झाल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की विमानात 43 प्रवासी होते, ज्यात 5 मुले आणि 6 क्रू मेंबर्स होते. उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क तुटला. विमान त्याच्या लँडिंग स्पॉटजवळ होते, परंतु अचानक एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रडार स्क्रीनवरून गायब झाले. त्याच वेळी, विमान रडारवरून गायब झाल्यानंतरच अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली. 

हेही वाचा - मृतदेहाची अदलाबदल! अहमदाबाद अपघातातील प्रशासनाची घोडचूक उघड

स्थानिक पोलिस आणि अमूर प्रदेशातील शोध पथकांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविण्यात आली तेव्हा टेकडीवरील जंगलातून धूर निघताना दिसला. विमानाचा जळता ढिगारा घटनास्थळी सापडला. अपघातग्रस्त विमान हे सोव्हिएत रशियामध्ये बनवलेले मध्यम श्रेणीचे डबल-इंजिन टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे. हे विमान कमी अंतरापर्यंत उड्डाण करण्यासाठी बनवले गेले होते. हे विमान फक्त प्रादेशिक उड्डाणांसाठी वापरले जाते. हे विमान विशेषतः रशिया, पूर्व युरोप आणि आशियातील दुर्गम भागात उड्डाण करण्यासाठी डिझाइन केले होते.

रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले - 

हेही वाचा - दुर्दैवी! बांगलादेशातील विमान अपघातात 16 विद्यार्थी, 2 शिक्षकांसह 19 जणांचा मृत्यू

दरम्यान, अँटोनोव्ह-24 विमान 1500 ते 2,000 किलोमीटर अंतरापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. या विमानाची खास गोष्ट म्हणजे ते कमी अंतराच्या धावपट्टीवर सहजपणे उड्डाण आणि उतरू शकते. त्याच्या डिझाइनमुळे, हे विमान अनेकदा मालवाहू विमान म्हणून वापरले जाते. तथापी, हे विमान लष्करी वाहतुकीसाठी देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते.


सम्बन्धित सामग्री