Wednesday, August 20, 2025 09:36:17 AM

बांगलादेशात तालिबानी फर्मान लागू? महिला-मुलींसाठी नवीन ड्रेस कोड जारी

बांगलादेश बँकेने महिला कर्मचाऱ्यांसाठी नव्या ड्रेस कोडचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये महिलांच्या पेहरावावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

बांगलादेशात तालिबानी फर्मान लागू महिला-मुलींसाठी नवीन ड्रेस कोड जारी
प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

ढाका: माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेबाहेर पडल्यानंतर बांगलादेशमध्ये महिलांच्या अधिकारांवर मर्यादा घालणाऱ्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बांगलादेश बँकेने महिला कर्मचाऱ्यांसाठी नव्या ड्रेस कोडचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये महिलांच्या पेहरावावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

साडी किंवा सलवार कमीज अनिवार्य - 

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, महिलांना कार्यालयात साडी किंवा सलवार-कमीजसह ओढणी/स्कार्फ घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. कपड्यांचा रंग व्यावसायिक आणि सौम्य असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. औपचारिक सँडल किंवा शूज वापरणे आवश्यक असून ड्रेस कोडमध्ये साध्या हिजाबचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

नियमांचे पालन अनिवार्य - 

बांगलादेश बँक कर्मचारी नियमन 2003 च्या कलम 39 अंतर्गत या नव्या नियमांचे पालन अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात एक अधिकारी नियुक्त करून या नियमांची अंमलबजावणी आणि निरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

हेही वाचा - जगप्रसिद्ध रेसलर हल्क होगन काळाच्या पडद्याआड; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

याशिवाय, लैंगिक छळाच्या तक्रारी 30 कामकाजाच्या दिवसांत संबंधित समितीकडे सादर कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरही कार्यालयीन नियमांचे पालन करणे आवश्यक असून, उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

हेही वाचा - थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला! 2 लष्करी तळ उद्ध्वस्त; 9 जणांचा मृत्यू

ड्रेस कोडमुळे सामाजिक वादाला तोंड फुटण्याची शक्यता -  

तथापी, या ड्रेस कोडवरून बांगलादेशात नव्या राजकीय आणि सामाजिक वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक महिला अधिकार कार्यकर्त्यांनी यास तालिबानी पद्धतीचा हस्तक्षेप असे म्हणत विरोध दर्शवला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री