Monday, September 01, 2025 04:59:55 AM

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अडचणी वाढल्या; अटक वॉरंट जारी

हसीना सरकारने सत्ता सोडल्यापासून जवळजवळ दहा महिने उलटले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्या आली आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अडचणी वाढल्या अटक वॉरंट जारी
Sheikh Hasina
Edited Image

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी आता वाढणार आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने रविवारी शेख हसीना आणि इतर दोन जणांवर गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनांना हिंसकपणे दडपल्याच्या प्रकरणात सामूहिक हत्येसह अनेक गंभीर आरोपांवर आरोप निश्चित केले. रविवारच्या कार्यवाहीनंतर, हसीना यांच्याविरुद्ध खटला त्यांच्या अनुपस्थितीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - युक्रेनचा रशियाच्या 2 हवाई तळावर ड्रोन हल्ला! 40 हून अधिक विमाने नष्ट केल्याचा दावा

शेख हसीना यांच्याविरुद्ध मोठी कारवाई

हसीना सरकारने सत्ता सोडल्यापासून जवळजवळ दहा महिने उलटले आहेत. त्यानंतर आता त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्या आली आहे. या प्रकरणात, निदर्शने क्रूरपणे चिरडल्याबद्दल सरकारी वकिलांनी हसीना यांच्याविरुद्ध औपचारिकपणे आरोप दाखल केल्यानंतर तीन सदस्यीय न्यायाधिकरण खंडपीठाने म्हटले आहे. यासोबतच, न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्ज्झमान खान कमाल यांच्याविरुद्ध नवीन अटक वॉरंट देखील जारी केले आहे. तिसरा आरोपी, तत्कालीन पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन सध्या कोठडीत आहे. 

हेही वाचा - Nigeria Flood: नायजेरियात पुरामुळे मोठा विध्वंस! 117 जणांचा मृत्यू, पहा व्हिडिओ

दरम्यान, बांगलादेशच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या न्यायाधिकरणाच्या कामकाजाचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की हे भारतात आश्रय घेणाऱ्या शेख हसीना यांना थेट संदेश देण्यासाठी आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या निषेधानंतर शेख हसीना यांचे सरकार सत्तेवरून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हेगारी खटले सुरू आहेत.
 


सम्बन्धित सामग्री