Caribbean drunken monkeys : 'आधीच कळकट, तशात मर्कट, तशाच मद्य प्याला' ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पण खरंच एखाद्या माकडाने दारू प्यायली, तर त्याच्या मर्कटलीला कशा असतील, त्याची तुम्ही सहज कल्पना करू शकाल.
कॅरिबियनच्या उष्णकटिबंधीय नंदनवनात, सेंट किट्स बेट (Island of St. Kitts) त्याच्या नितळ समुद्रकिनारे, चैतन्यशील संस्कृतीसाठी ओळखले जाते. मात्र, तुम्हाला माहितीये का, हे ठिकाण मद्यधुंद माकडांसाठीही ओळखले जाते? खरंच! या हिरवळीच्या बेटावर, व्हर्वेट माकडांचा एक अनोखा गट त्यांच्या 'दारूप्रेमा'साठी कुप्रसिद्ध झाला आहे. हा माकडांचा गट आणि मानवी वर्तनासोबत मनोरंजकरीत्या साम्य दर्शवतो.
हेही वाचा - Egg Shortage In America 2025 : अमेरिकेत रेंट-द-चिकन स्कीम; म्हणजे काय आणि कशासाठी?
तीन शतकांपूर्वी, युरोपियन स्थायिकांनी कॅरिबियनमध्ये ऊस आणि रम उत्पादन आणले. उसाच्या शेतांची भरभराट होत असताना, गोड रसाचे रममध्ये रूपांतर करणाऱ्या डिस्टिलरीजही वाढल्या. या डिस्टिलरीजमधील कचरा, ज्यामध्ये टाकून दिलेला आंबवलेला ऊस देखील समाविष्ट असतो, तो बहुतेक वेळा स्थानिक व्हर्वेट माकडांना तो सापडू शकेल अशा ठिकाणी फेकला जात असे.
कालांतराने, या हुशार माकडांना अल्कोहोलची आवड निर्माण झाली. त्यांनी उसाच्या आंबवण्यापासून सुरुवात केली आणि पुढचा टप्पा गाठला. ही माकडे पर्यटकांचं लक्ष नसताना गोड कॉकटेलचा आनंद घेण्यासाठी स्थानिक बार आणि रिसॉर्ट्सवर वारंवार चोऱ्या करतात. आज, सेंट किट्समधील व्हर्वेट माकडे त्यांच्या अल्कोहोलिक पेयांच्या आवडीसाठी ओळखली जात आहेत. त्यांची वागणूक मद्यधुंद माणसांसारखीच असते.
सेंट किट्समधील व्हर्वेट माकडांबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे अल्कोहोलच्या प्रभावाखाली त्यांचे वर्तन मानवांसारखे कसे असते. येथील माकडांच्या वर्तणुकीमध्ये मानवी वर्तनाप्रमाणेच काही उल्लेखनीय समानता आहेत.
काहीजण 'टुल्ल' होऊनही जाणवू देत नाहीत; तर, काही जरा 'घेतली' तरी डुलतात
मानवांप्रमाणेच, सर्वच माकडे एकसारख्या प्रमाणात 'पीत' नाहीत. त्यांच्यातही 'अल्कोहोल टॉलरन्स' वेगवेगळा असतो. काही व्हर्वेट माकडे नशेची स्पष्ट चिन्हे न दाखवता लक्षणीय प्रमाणात मद्यपान करू शकतात, तर, काही माकडांना काही जणांना लगेच 'चढते'. अशी माकडे थोडे घोट घेतल्यानंतरही हवेवर स्वार झालेली आणि झिंगलेली असतात.
सामाजिक मद्यपान पद्धती (Social Drinking Patterns)
मानवांप्रमाणेच व्हर्वेट माकडे देखील सामाजिक मद्यपान करतात. काही जण गटांनी मिळून मद्यपान करण्यास प्राधान्य देतात. ती एकमेकांनी 'आणलेली' टेस्ट करतात आणि वाटून पितात. तर, काही माकडांना एकांतात, शांततेत घुटके घ्यायला आवडते. मनोरंजक गोष्ट म्हणजे, ही माकडे मद्यपान करणाऱ्यां मानवांप्रमाणेच तशाच प्रकारचे 'व्यक्तिमत्व प्रकार' प्रदर्शित करतात.
हेही वाचा - अब्जाधीश एलोन मस्क बनले 14 व्या मुलाचे बाप, शिवॉन झिलिससह गुपचुपपणे केले बाळाचे स्वागत
व्यसन आणि संयम
मानवांप्रमाणेच काही व्हर्वेट माकडांना अल्कोहोलचे व्यसन लागते. काही माकडे जास्त मद्यपान करणारी बनतात. तर, काही थोड्याच प्रमाणाच घेतात. तर, काही जण पूर्णपणे मद्यपान टाळतात.
मॉर्निंग आफ्टर इफेक्ट्स: (रात्री जास्त झाली की सकाळीही टाईट)
'हँगओव्हर' चा अनुभव सर्वच मद्यपींना येतो. काही व्हर्वेट माकडे, रात्री जास्त मद्यपान केल्यानंतर, मानवाप्रमाणे हँगओव्हरसारखे वर्तन दाखवतात, असे आढळून आले आहे. ते आळशी, चिडचिडी बनलेली असतात आणि पाणी किंवा गोड फळे शोधतात, ज्यामुळे त्यांची अस्वस्थता कमी होऊ शकते.
आणखी एक मनोरंजक बाब आहे. एखादे माकड जितके जास्त मद्यपी असेल, तितकेच ते त्यांच्या टोळक्याचा नेता बनण्याची शक्यता जास्त असते. अशा माकडाला इतर माकडेही मानतात आणि त्याच्या म्हणण्यानुसार वागतात.