Sunday, August 31, 2025 02:56:04 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी आता 'या' 14 देशांवर लादला कर; म्यानमारकडून आकारले सर्वाधिक शुल्क

ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी म्यानमार आणि लाओसवर सर्वाधिक 40 टक्केल कर लावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आता या 14 देशांवर लादला कर म्यानमारकडून आकारले सर्वाधिक शुल्क
Donald Trump
Edited Image

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 जुलै रोजी जपान, दक्षिण कोरिया आणि इतर 14 देशांवर नवीन कर लागू केले. ट्रम्प यांनी ही घोषणा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर केली. हे कर 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होतील. ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक आहे. ट्रम्प यांनी म्यानमार आणि लाओसवर सर्वाधिक 40 टक्केल कर लावला आहे. 

कोणत्या देशावर किती कर लादला? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर 14 देशांच्या नेत्यांना पाठवलेले पत्र शेअर केले, ज्यामध्ये जपान आणि दक्षिण कोरियावर 25% टॅरिफची घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या पत्रानुसार, मलेशिया, कझाकस्तान, ट्युनिशियावर 25%, दक्षिण आफ्रिका आणि बोस्नियावर 30%, इंडोनेशियावर 32%, बांगलादेश आणि सर्बियावर 35%, थायलंड आणि कंबोडियावर 36% आणि म्यानमार आणि लाओसवर 40% टॅरिफ लावला जाईल. जो 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.

हेही वाचा 4.5 ट्रिलियन डॉलर्सचा ''वन बिग ब्युटीफुल बिल'' काय आहे? भारतावर काय परिणाम होईल?

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्काबाबत पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, अमेरिकेसोबतची असंतुलित व्यापार तूट कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच त्यांनी जपान आणि दक्षिण कोरियासारख्या प्रमुख व्यापारी भागीदारांना इशारा दिला की जर त्यांनी अमेरिकन वस्तूंसाठी आपली बाजारपेठ खुली केली आणि व्यापारातील अडथळे दूर केले तर शुल्क कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. ट्रम्प यांनी असा इशाराही दिला आहे की जर या देशांनी प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले तर अमेरिका शुल्क आणखी वाढवू शकते.

हेही वाचा -  Iran Israel Ceasefire: ''दोन्ही देशांना युद्धबंदी हवी होती...''; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

तथापी, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जर कोणत्याही देशाने अमेरिकेवर कर वाढवले ​​तर अमेरिका देखील त्यानुसार प्रतिसाद देईल. तसेच ट्रम्प यांनी या देशांसाठी शुल्क जाहीर केले असले तरी, त्यांनी वाटाघाटीसाठी दार उघडे ठेवले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'मी दृढ म्हणेन, पण 100 टक्के दृढ नाही. जर त्यांनी फोन करून सांगितले की आम्हाला काहीतरी वेगळे करायचे आहे, तर आम्ही वाटाघाटीसाठी तयार आहोत.'
 


सम्बन्धित सामग्री