भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून चीनवर 104% कर लादला. पण आता भारतासह जगातील इतर देशांना करात 90 दिवसांची सवलत देण्यात आली आहे. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे चिनी कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. भारत याचा फायदा घेत स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक भाग आयात करत आहे. त्यानंतर लवकरच भारतीय बाजारात स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात. परिणामी तुम्हाला स्वस्त दरात स्मार्टफोन, टीव्ही आणि रेफ्रिजरेटर मिळू शकतात.
भारतात काय स्वस्त होईल?
ज्या चिनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या अमेरिकेला त्यांचे सामान विकत होत्या, त्यावर आता अमेरिकेने जास्त कर लावला आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, या कंपन्या आता भारताला 5% स्वस्त दरात वस्तू पुरवण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा की भारतीय इलेक्ट्रॉनिक कंपन्या आता कमी किमतीत चिनी भाग खरेदी करू शकतात, म्हणजेच भारतात बनवलेल्या स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर इत्यादींच्या किमती कमी होतील.
हेही वाचा - नवीन टॅरिफ मागे घ्या...! एलोन मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन
दरम्यान, गोदरेज एंटरप्रायझेसचे कमल नंदी यांच्या मते, चीनमधून अमेरिकन ऑर्डर कमी होत आहेत, त्यामुळे भारतीय कंपन्या आता स्वस्त दरात डील करण्यास तयार आहेत. तर सुपर प्लास्टोनिक्स (टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी) चे सीईओ अवनीत सिंग मारवाह यांनी सांगितलं की, अमेरिकेतून मागणी कमी झाल्यामुळे चिनी कंपन्यांची स्थिती बिकट झाली असून आणि भारतीय कंपन्या याचा फायदा घेतील. यासोबतच सरकार देखील यामध्ये मदत करत आहे.
हेही वाचा - इराण-अमेरिका तणाव शिगेला! ट्रम्प यांची इराणला बॉम्ब हल्ल्याची धमकी
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून चीनवर 104% कर लादला, त्यानंतर चीनने अमेरिकन वस्तूंवर 84% कर लादून प्रत्युत्तर दिले. यानंतर, ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरील कर पुन्हा 125% पर्यंत वाढवला. दुसरीकडे, ट्रम्प यांनी ज्या देशांनी प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले नाही, त्यात भारताचा समावेश आहे.