Monday, September 01, 2025 12:49:30 AM

जगातील एकमेव देश जो आजही ८ वर्षे मागे आहे, जाणून घ्या कसं

जगातील इथिओपिया असा देश आहे. जो जगाच्या तुलनेत ८ वर्ष मागं आहे.

जगातील एकमेव देश जो आजही ८ वर्षे मागे आहे जाणून घ्या कसं
जगातील एकमेव देश जो आजही ८ वर्षे मागे आहे, जाणून घ्या कसं

प्रत्येक देशाची स्वतःची एक वेगळी ओळख असते. काही देश त्यांच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असतात. तर काही ऐतिहासिक वारशासाठी ओळखले जातात. पण जगात एक असा देश आहे जो केवळ आपल्या परंपरा आणि इतिहासासाठीच नव्हं तर त्याच्या वेगळ्या दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरसाठीही प्रसिद्ध आहे. हा देश म्हणजे इथिओपिया. इथिओपिया एकमेव असा देश जो १३ महिन्यांचे वर्ष वापरतो आणि ग्रेगोरियन कॅलेंडरच्या म्हणजे जगाच्या तुलनेत इथिओपिया जवळपास ८ वर्षे मागे आहे.

जगातील बहुतांश देश हे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतात. ज्यामध्ये १२ महिने असतात. पण इथिओपियामध्ये इथिओपियन कॅलेंडर वापरला जातो. ज्यामध्ये १३ महिने असतात. या कॅलेंडरची रचना रोमन चर्चने ५२५ ईसवीमध्ये केली होती. या कॅलेंडरमध्ये १३ महिने असतात आणि त्यातील १२ महिने हे ३०-३० दिवसाचे असतात. राहिलेला १३वा महिना ज्याला पेगम म्हटलं जातं तो फक्त ५ दिवसांचा असतो आणि लीप वर्षात तो ६ दिवसांचा असतो. इथिओपियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर यामधील फरकामुळे जर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार २०२४ वर्ष असेल तर इथिओपियन कॅलेंडरनुसार ते २०१७ असणार आहे.

हेही वाचा - Sunita Williams Love Story : सुनीता विल्यम्स यांचे पती कोण? जाणून घ्या त्यांची लव स्टोरी

इथिओपिया हा केवळ त्याच्या अनोख्या कॅलेंडरसाठीच प्रसिद्ध नाही. तर तो आपली संस्कृती आणि सण यांच्यासाठीही ओळखला जातो. इथिओपियन नववर्ष ११ सप्टेंबरला साजरे केले जाते. त्यांच्या १३व्या महिन्यात अनेक विशेष उत्सव आणि धार्मिक समारंभ आयोजित केले जातात. याशिवाय, इथिओपिया हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र अफ्रिकन देश आहे. जिथे अनेक अफ्रिकन देश वसाहतवादी सत्तांखाली होते. तिथे इथिओपियाने आपली स्वायत्तता कायम राखली. १९३५ मध्ये इटलीने इथिओपियावर आक्रमण केले. पण १९४१ मध्ये त्यांनी पुन्हा स्वतंत्रता मिळवली.

हेही वाचा - सुनिता विल्यम्सने गणपती बाप्पाची मूर्ती सोबत नेली होती! चुलत बहिणीने सांगितलं, सुनिता आहे भारतीय खाद्यपदार्थांचीही चाहती

इथिओपिया कॉफीचे उगमस्थान 
आज संपूर्ण जगभरात कॉफी लोकप्रिय आहे. पण कॉफीचा उगम इथिओपियामध्ये झाला आहे, असं मानलं जातं. इथिओपियन संस्कृतीत कॉफीचा मोठा सन्मान आहे आणि कॉफी सेरेमनी ही त्यांची एक महत्त्वाची परंपरा आहे.
 


सम्बन्धित सामग्री