Thursday, August 21, 2025 07:52:07 AM

कॉलेज जीवनात दोनदा नापास, 5 वर्षे पत्रकारिता...नंतर सुरू केला व्यवसाय! कोण आहे 'हा' चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती?

ते नोंगफू स्प्रिंग या चिनी बाटलीबंद पाण्याच्या कंपनीचा अध्यक्ष आहे. एवढेच नाही तर तो बीजिंग वांटाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइझचे सर्वात मोठा शेअरहोल्डर आहेत.

कॉलेज जीवनात दोनदा नापास 5 वर्षे पत्रकारितानंतर सुरू केला व्यवसाय कोण आहे हा चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Zhong Shanshan
Edited Image

Richest Person in China: प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं. आज आम्ही तुम्हाला चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल बोलायचे झाले तर, चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झोंग शानशान (Zhong Shanshan) आहे. झोंग शानशान हे चीनमधील सर्वात मोठे उद्योगपती आहेत. ते नोंगफू स्प्रिंग या चिनी बाटलीबंद पाण्याच्या कंपनीचा अध्यक्ष आहे. एवढेच नाही तर तो बीजिंग वांटाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइझचे सर्वात मोठा शेअरहोल्डर आहेत. ही कंपनी लस आणि हेपेटायटीस चाचणी किट बनवते.

जगातील 24 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, झोंग शानशान हे जगातील 24 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 58.2 अब्ज डॉलर्स आहे. 2021 मध्ये, झोंग शानशान मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तथापि, नंतर झोंग शानशान मागे पडले आणि मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

हेही वाचा - पूर्वी खाद्य तर आता थेट फ्लाइटवर! झोमॅटोच्या सीईओ दीपिंदर गोयल गुंतवले एरोस्पेस स्टार्टअपमध्ये पैसे

झोंग शानशान यांचा जन्म 1954 मध्ये पूर्व चीनमधील हांगझोऊ शहरात झाला. 1970 च्या दशकात झोंग दोनदा महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेत नापास झाले. यामुळे त्यांना नंतर मुक्त विद्यापीठातून शिक्षण घ्यावे लागले. झोंग यांनी 1980 मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला आणि सुमारे पाच वर्षे पत्रकार म्हणून काम केले.

हेही वाचा - मुंबईतील धारावीनंतर अदानी समूहाने 'या' प्रकल्पासाठी लावली 36,000 कोटींची बोली

झोंग यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला - 

नंतर झोंगने दक्षिण चीनच्या हैनान प्रांतात बाटलीबंद पाण्याचे वितरण व्यवसाय चालवला. 1993 मध्ये, झोंग यांनी आरोग्य उत्पादन ब्रँड यांगशेंगटांग आणि सप्टेंबर 1996 मध्ये, पेय ब्रँड नोंगफू स्प्रिंगची स्थापना केली. 2020 मध्ये, नोंगफूने हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजवर सार्वजनिक व्यापार सुरू केला. येथून पुढे, झोंग यांनी मोठं यश मिळवलं. आज झोंग शानशान चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
 


सम्बन्धित सामग्री