Thursday, August 21, 2025 04:41:20 AM

Thailand Earthquake: भूकंपानंतर थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

पंतप्रधान मोदींनी थायलंडला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भारतीय दूतावासाने थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली असून एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

thailand earthquake भूकंपानंतर थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन नंबर जारी
Thailand Earthquake
Edited Image, Twitter

Thailand Earthquake: थायलंडमध्ये आज 7.7 तीव्रतेचा भयानक भूकंप झाला आहे. या भूकंपात अनेकांचा मृत्यू झाला असून 90 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. हा भूकंप इतका भयानक होता की, यात बांधकाम सुरू असलेली इमारत जमीनदोस्त झाली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींनी थायलंडला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भारतीय दूतावासाने थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली असून एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

भारतीय दूतावासाने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहिले आहे की, 'बँकॉक आणि थायलंडच्या इतर भागांमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर, दूतावास थाई अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय नागरिकाशी संबंधित कोणतीही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही.' 

हेही वाचा - बँकॉकमध्ये 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रचंड विनाश! बहुमजली इमारत कोसळली, अनेक नागरिक बेपत्ता; पहा व्हिडिओ

थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन नंबर जारी - 

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, थायलंडमधील भारतीय नागरिकांना +66 618819218 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बँकॉकमधील भारतीय दूतावास आणि चियांग माई येथील वाणिज्य दूतावासातील सर्व सदस्य सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. 

हेही वाचा - Myanmar Earthquake: म्यानमार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले! 7 रिश्टर स्केलहून अधिक होती तीव्रता

शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये अनेक उंच इमारती कोसळल्या. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जिओसायन्स जीएफझेडनुसार, भूकंप 10 किलोमीटर (6.2 मैल) खोलीवर झाला आणि त्याचे केंद्र म्यानमारमधील मंडालेजवळ होते.

इमारत कोसळतानाचा व्हायरल व्हिडिओ - 

एका इमारतीच्या कोसळण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इमारत कोसळताना पाहून आजूबाजूचे लोक वेगाने धावताना दिसत आहेत. भूकंपात कोसळलेल्या बांधकामाधीन उंच इमारतीच्या ठिकाणी असणारे 90 लोक बेपत्ता असून तिघांचा मृत्यू झाल्याचे थायलंडच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री