Pakistan Train Hijack: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने एका ट्रेनचं अपहरण केलं. बीएलएने म्हटले आहे की, त्यांनी 182 प्रवाशांना ओलीस ठेवले असून आतापर्यंत 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेल्याचा दावा केला आहे. ट्रेन अपहरण केल्यानंतर, बीएलएने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये त्यांनी शाहबाज सरकारला स्पष्टपणे इशारा दिला की, जर पाक सैन्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली तर ते सर्व ओलितांना ठार मारतील. तथापि, या घटनेवर पाकिस्तानी लष्कर किंवा पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
बलुच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते झायेद बलुच यांनी सांगितले की, 'बलुच लिबरेशन आर्मीने मश्काफ, धादर, बोलान येथे एक सुनियोजित ऑपरेशन केले आहे, जिथे आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे, ज्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबली आहे. सैनिकांनी ताबडतोब ट्रेन ताब्यात घेतली आणि सर्व प्रवाशांना ओलीस ठेवले.
हेही वाचा - पाकिस्तानात अख्खी ट्रेनच झाली हायजॅक..! बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या प्रमुख गटाने स्वीकारली जबाबदारी
लष्करी कारवाई केल्यास होणार गंभीर परिणाम -
बीएलएने आपल्या निवेदनात शाहबाज शरीफ सरकारला स्पष्ट इशारा दिला असून म्हटलं आहे की, 'जर पाकिस्तानी सैन्याने कोणतेही ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील. सर्व शेकडो ओलिस ठेवलेले प्रवाशी मारले जातील आणि या रक्तपाताची जबाबदारी पूर्णपणे पाक सैन्यावर असेल.'
बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी -
तथापि, बीएलएने दावा केला आहे की, आतापर्यंत सहा लष्करी जवान मारले गेले आहेत आणि शेकडो प्रवासी अजूनही बीएलएच्या ताब्यात आहेत. या कारवाईची संपूर्ण जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी घेते. बीएलएने पुढे म्हटले आहे की, हे ऑपरेशन मजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि बीएलएच्या विशेष युनिट फतेह स्क्वॉडद्वारे संयुक्तपणे केले जात आहे. कोणत्याही लष्करी कारवाईला तितक्याच ताकदीने उत्तर दिले जाईल.
हेही वाचा - Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये दहशदवादी हल्ला; 100 हून अधिक प्रवाशांना बंदी
याशिवाय, बीएलएने अंतिम इशारा देताना सांगितलं आहे की, 'जर हवाई हल्ला त्वरित थांबवला नाही तर पुढील एका तासात सर्व 100 हून अधिक ओलिसांना मारले जाईल. पाकिस्तानी भूदलाने बचाव मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु बीएलएच्या सैनिकांनी त्यांना परतवून लावले.