Sunday, September 07, 2025 02:44:12 PM

Hindi In Russian Universities: रशियन विद्यापीठांमध्ये भारतीय भाषा शिकवली जाणार; पुतिन यांच्या मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय

रशियन विज्ञान आणि उच्च शिक्षण उपमंत्री कॉन्स्टँटिन मोगिलेव्स्की यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांना अधिकाधिक रशियन विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावी अशी इच्छा आहे.

hindi in russian universities रशियन विद्यापीठांमध्ये भारतीय भाषा शिकवली जाणार पुतिन यांच्या मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय

Hindi In Russian Universities: भारत आणि रशियामधील मैत्री नेहमीच खूप मजबूत राहिली आहे. आता ही मैत्री आणखी घट्ट करण्यासाठी रशियन सरकारने त्यांच्या विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन विज्ञान आणि उच्च शिक्षण उपमंत्री कॉन्स्टँटिन मोगिलेव्स्की यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांना अधिकाधिक रशियन विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावी अशी इच्छा आहे.

उपमंत्री मोगिलेव्स्की यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असून, अनेक भारतीय दैनंदिन जीवनात इंग्रजीपेक्षा हिंदी बोलणे पसंत करतात. भारताला अधिक जवळून समजून घेण्यासाठी हिंदी शिकणे महत्त्वाचे आहे. आता रशियातील तरुणांसाठी हिंदी शिकणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. राजधानी मॉस्कोमधील MGIMO, RSUH आणि Moscow State University यासह अनेक विद्यापीठांमध्ये हिंदी शिकवली जात आहे. हिंदीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. ही क्रेझ फक्त मॉस्कोपुरती मर्यादित नाही, तर सेंट पीटर्सबर्ग आणि कझानसारख्या शहरांमध्येही हिंदी शिकण्याच्या संधी वाढत आहेत.

हेही वाचा - World Most Expensive School : जगातील सर्वात महागडी शाळा! वर्षाची फी तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त

रशियाने हिंदीचा प्रचार अशा वेळी केला आहे जेव्हा भारत-रशिया मैत्री पुन्हा एकदा जागतिक स्तरावर लक्षवेधी ठरत आहे. अमेरिकेने भारतावर तेल खरेदी शुल्क दुप्पट केले तरी भारताने रशियासोबत तेल व्यापार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर भारत-रशिया संबंध सर्वात स्थिर राहिले आहेत.

हेही वाचा - PM Modi On Trump: ट्रम्पच्या मैत्रीपूर्ण विधानावर मोदींचा सकारात्मक प्रतिसाद; असं काय म्हणाले पंतप्रधान?

दरम्यान, ही मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षी डिसेंबरमध्ये भारताला भेट देणार आहेत. एकंदरीत, रशियामध्ये हिंदीचा प्रचार हा फक्त भाषेचा प्रसार नाही तर भारतासोबतच्या त्यांच्या खोल आणि टिकाऊ मैत्रीचा आणखी एक पुरावा आहे.
 


सम्बन्धित सामग्री